पावसामुळे पुलाचा भराव गेला वाहून, शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान

सुभाष बिडे
Sunday, 20 September 2020

गेल्या दिवसांपासून पाऊस पडत आहे. यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.

घनसावंगी (जि.जालना) : अंबड ते कुंभारपिंपळगाव दरम्यान स्त्याच्या काम करण्यात येत आहे. नाल्यावरील पुलाच्या कामासाठी पर्यायी रस्ता म्हणून करण्यात आलेला मातीचा भरावाचा रस्ता पावसामुळे वाहून गेला आहे. शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अंबड ते कुंभारपिंपळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मागील वर्षांपासून सुरू असून या कामाचा रस्त्यावर अनेक ठिकाणी असलेल्या नदी व नाल्यावरील पुलांचे काम करण्यात येत आहे.

पिकांचे नुकसान झाल्याचे पाहून शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सिंदखेडजवळील नाल्यावर पूलाचे काम करण्यात येत असल्याने त्याच्या बाजूला रस्त्याची वाहतुकीसाठी संबंधित कंत्राटदाराकडून मातीचा भराव टाकून रस्ता करून देण्यात आला होता. परंतु घनसावंगी तालुक्यांमध्ये होत असलेल्या पावसामुळे शनिवार (ता.१९) रात्री झालेल्या पावसामुळे हा मातीचा भराव वाहून गेला. त्यामुळे रात्रभर वाहतूक विस्कळीत झाली नव्हती. या नाल्याचे पाणी जवळील शेतकरी कल्याण ईखाजी पांढरे यांच्या शेतात शिरल्याने सोयाबीन, कापूस, ऊस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.

लॉकडाउनमुळे मद्यातून मिळणारा अकराशे कोटींचा महसूल बुडाला, मराठवाड्यातील चित्र

या रस्त्याच्या कामाचे मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. काम सुरू झाल्यापासूनच रस्त्यावर आतापर्यंत दोन ते तीन जणांचा बळी गेला आहे. तसेच मातीचा भराव करण्यात येत असल्याने राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्याच्या खाली गेल्याचे दोनदा घटना घडल्या आहेत. या जीवितहानी झालेली नाही. रस्त्याच्या कामात मुरुमाऐवजी मातीचा वापर करण्यात येत असल्यासंबंधीची तक्रारी पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे करण्यात आली होती.

 

यावेळी त्यांनी संबंधित कामाच्या अभियंत्यांवर कामाचा दर्जाबद्दल ताशेरे ओढले होते, परंतु कामात कोणती सुधारणा झाली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला असून या चिखलामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच काही ठिकाणी खडी टाकण्यात आली आहे. ही खडी व्यवस्थित दबाई करण्यात आली नाही. पर्यायाने दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Water Damaged Bridge Jalna News