esakal | पावसाचे पाणी घरात शिरले, अनेकांना रात्र जागून काढावी लागली
sakal

बोलून बातमी शोधा

किन्होळा (जि.हिंगोली) गावात आसना नदीच्या पुराचे पाणी अनेकांच्या घरात शिरले होते.

पावसाचे पाणी घरात शिरले, अनेकांना रात्र जागून काढावी लागली

sakal_logo
By
प्रभाकर बारसे

गिरगाव (जि.हिंगोली) : वसमत Vasmat तालुक्यातील किन्होळा गावात मंगळवारी (ता.१३) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे Rain आसना नदीला आलेल्या पुराचे पाणी १५ ते २० गावकऱ्यांच्या घरात शिरले आहे. यात संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन पाहणी केली आहे. तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे आसना नदी दुथडी भरून वाहत आहे. ही नदी किन्होळा गावाजवळुन वाहते. मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने आसना नदीला पूर Hingoli आला. या पुराचे पाणी रात्री उशिरा गावात आले. पूर वाढत गेल्याने गावात आलेले पाणी पंधरा ते वीस गावकऱ्यांच्या घरात शिरले.rain water enter in houses, many did not sleep in vasmat tahsil of hingoli glp88

हेही वाचा: परभणीतील पालम तालुक्यात नद्यांना पूर, गावांचा संपर्क तुटला

यात विश्वंभर चव्हाण, माणिक चव्हाण, पांडुरंग चव्हाण, राहुल चव्हाण आदी गावकऱ्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजले असून गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली. किन्होळा गाव आसना नदीच्या काठावर असून जवळपास सर्वच नदी नाले भरुन जात होते. त्यात कुंरुदा येथील जलेश्वर नदीचे पाणी सुद्धा याच मार्गाने जाते. त्यामुळे आसना नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात आले होते. रात्री आलेल्या पाण्यामुळे एकच धावपळ झाली होती. दरम्यान, बुधवार (ता.१४) तलाठी नंदा डाके व ग्रामसेवक श्री.पवार यांनी गावात भेट देऊन पाहणी केली आहे. गावात येणाऱ्या आसना नदीच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावल्यास गावकऱ्यांना धोका होणार नाही. या नदीला पूर आल्यावर ते पाणी गावात येते. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गावात येणारे पाणी बाहेर कसे काढता येईल, याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

loading image