esakal | मराठवाड्यातील जिल्ह्यात आठ मेपर्यंत पाऊस; परभणी कृषी विद्यापीठाकडून अंदाज व्यक्त
sakal

बोलून बातमी शोधा

परभणी कृषी विद्यापीठ

मराठवाड्यातील जिल्ह्यात आठ मेपर्यंत पाऊस; परभणी कृषी विद्यापीठाकडून अंदाज व्यक्त

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणीः मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये आगामी एक मेपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान केंद्राच्यावतीने वर्तविण्यात आली आहे. या दिवसात शेतकऱ्यानी पिकांचे योग्य व्यवस्थापन करण्याचा सल्लाही दिला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात ता. 28 व 29 एप्रिल रोजी उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व हलक्या पावसाची शक्यता आहे. ता. 30 एप्रिल रोजी नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. ता. एक मे रोजी बिड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार मराठवाड्यात ता. दोन ते आठ मे दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे अशी माहिती ग्रामीण कृषी हवामान केंद्राचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली.

हेही वाचा - काळजी घ्या पण काळजी करु नका असा रुग्ण, नातेवाईकांना जिव्हाळ्याचा सल्ला देतानाच येत्या दहा दिवसांत अख्या महाराष्ट्रातून कोरोना विषाणू हद्दपार होणार

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेच आहे. सध्‍याच्‍या काळातउशीरा लागवड केलेल्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. हळदीची उघडयावर साठवण करु नये. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना काठीचा आधार द्यावा. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना काठीचा आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी. वाऱ्याचा वेग लक्षात घेता नवीन लागवड केलेल्या झाडांना काठीचा आधार द्यावा असे शास्त्रज्ञ सांगतात.

भाजीपाला व फुल शेती

उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या भाजीपाला पिकात पाण्‍याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्‍यावी. काढणीस तयार असलेल्या कांदा पिकाची काढणी करावी. काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. तसेच काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी व प्रतवारी करुन, ती बाजारपेठेत विक्रीस पाठवावी.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image