
Aurangabad : 2 लाख ७३ हजार लोकांना नकोय 'छत्रपती संभाजी नगर' नाव; समर्थनात अन् विरोधात 'एवढे' अर्ज
छत्रपती संभाजी नगरः औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात आलेलं आहे. केंद्राच्या मंजुरीनंतर प्रशासनाने महापालिका, जिल्हा परिषद, तालुका, प्रशासकीय कार्यालयांची नावं बदलली. त्यामुळे आता औरंगाबाद जिल्ह्याचं नाव अधिकृतरित्या छत्रपती संभाजी नगर झालेलं आहे.
या बदलेल्या नावांच्या संदर्भात आज प्रशासनाकडे हरकती घेण्यात आल्या. समर्थनामध्ये आणि विरोधामध्ये किती लोक आहेत, याची अंदाजे आकडेवारी विभागीय आयुक्त कार्यालयाने जाहीर केली. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये 'छत्रपती संभाजी नगर' या नावाच्या समर्थनार्थ आणि विरोधात ५ लाख १२ हजार २४६ अर्ज आले.
हेही वाचाः नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार
'छत्रपती संभाजी नगर' या नावाच्या समर्थनार्थ ४ लाख ३ हजार अर्ज दाखल झाले आहेत. तर विरोधात २ लाख ७३ हजार अर्ज दाखल झाले आहेत. औरंगाबादच्या नामांतराला प्रशासकीय पातळीवर हा हिरवा झेंडा आहे.
दुसरीकडे औरंगाबादच्या नामांतराविरोधात २ लाख ७३ हजार लोकांनी अर्ज दाखल केले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने नामांतराला विरोध झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. परंतु बदलेल्या नावाच्या बाजूने जास्त अर्ज असल्याने 'छत्रपती संभाजी नगर' हेच नाव कायम राहणार आहे.
आज औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये दाखल झालेल्या अर्जांची अंदाजित आकडेवारी सांगितली. दोन्ही बाजूंनी ५ लाख १२ हजार २४६ लोकांनी अर्ज दाखल केले आहेत. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
दरम्यान, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराला विरोध केला होता. त्यांनी थेट आंदोलनच सुरु केलं. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, असं म्हणत त्यांनी आंदोलन मागे घेतलं. शिवाय औरंगाबादच्या व्यापाऱ्यांनीही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं.