esakal | Vidhan Sabha 2019 : तुम्ही भाषणं खूप ऐकली, आज मी... - राज ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray speak in Kannad constituency in aurangabad District

तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला विनोद सांगेल पण आज मी असं काय करायला आलो नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे उपस्थितांशी बोलताना केले आहे.

Vidhan Sabha 2019 : तुम्ही भाषणं खूप ऐकली, आज मी... - राज ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कन्नड : तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला विनोद सांगेल पण आज मी असं काय करायला आलो नाही, आज इथे माझ्यासमोर महाराष्ट्रभरातील तरुण आणि तरुणी बसलेत आणि निवडणुका आल्या की या सगळ्या गोष्टी होतात मूळ विषय राहतात बाजूला आणि ह्याच्या वर टीका करतो त्याच्यावर टीका कर टाळ्या वाजवून मजा करणार आणि निघून जाणार आणि मग नंतर सगळ्या गोष्टींचा संताप करत बसणार पाच वर्ष.. निवडणुका गांभीर्याने घेत नाहीत याची ही लक्षण आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे उपस्थितांशी बोलताना म्हटले आहे.

तो रात्री पैसे टाकेल दारू पाहिजेल तो खायला घालेल. पूर्वीच्या काळात अशी एक पद्धत होती गाव जेवण लावले जायचं मग कोण उमेदवार तिथे वाढायला यायचा उमेदवार मीठ ताटात वाढायचा आणि म्हणायचा मिठाला जागायचं. अनेकजण माझ्या बाबतीत बोलतात राज ठाकरे शहरात जास्त लक्ष देतात ग्रामीण भागात येत नाही. जे शहरात झाले त्याचा परिणाम ग्रामीण भागात होत आहे. इथे रघुनाथ पूरवाडी या गावात राजकीय पक्षांना बंदी घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला होता पाच किलोमीटरचा रस्ता बांधला जात नाहीये रस्ता होत नाही. आज मी संवाद साधायचा आलोय. तुम्ही भाषण खूप ऐकली, असेही राज यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राची निराशा होते याचं कारण तुम्ही थंड आहात. गेल्या दोन तीन महिन्याची वर्तमानपत्र पाहिली, टीव्ही चॅनल पाहिले। राष्ट्रवादीचे अनेक लोक काँग्रेसचे अनेक लोकं भाजपकडून निवडणूक लढत आहेत. काय फरक पडणार आहे तुमच्या आयुष्यात हे इकडचे तिकडे गेले परत तुमच्या डोक्यावर तेच बसणार बदल काय घडणार असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

आम्ही सोशल नेटवर्किंगवर काय पाहणार मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या अगोदर एका ठिकाणी एका शेतकरी तरुण मुलांनी भारतीय जनता पक्षाचा टी-शर्ट घालून आत्महत्या केली, सरकारमध्ये बसलेल्या नादान लोकांमुळे आयुष्य संपवायचेच आहे तर ज्यांच्यामुळे आयुष्य संपत आहे त्यांना संपून जा महाराष्‍ट्र हतबल झाला आहे, असेही राज यांनी स्पष्ट केले आहे. मेक्सिको नावाच्या शहरांमध्ये चांगले रस्ते नाहीत म्हणून तिकडे रस्ते बनवणारा मंत्री त्याला हाताला दोऱ्या बांधल्या आणि गाडीला बांधून फरपटत नेला असल्याचेही राज यांनी यावेळी सांगिताना या नेत्यांना आता तुमची भीतीच वाटत नाही, उद्या कोणी का असेना माझ्या पक्षातील असेल तरी त्याला जाब विचारला पाहिजे, पिकाला भाव मागताय, तुम्हाला भाव कुठे मिळतोय, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

आज संपूर्ण देशात मंदीची लाट आहे, हे सगळं असताना इतके मूलभूत प्रश्‍न रखडलेले असताना आज महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा येतात आणि कश्मीर मधील 370 कलम काढून टाकलं हे सांगतात, त्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी काय संबंध? असा सवालही राज यांनी यावेळी केला. देशभक्त देशभक्त आम्ही पण आहोत, माझं माझ्या महाराष्ट्रावर प्रेम आहे. माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी हतबल असल्याचे राज यांनी सांगितले.

loading image