

Rajasthan Governor Haribhau Bagde Contributes One Month Salary to Maharashtra Chief Ministers Relief Fund for Farmers
esakal
चित्तेपिपंळगाव : राजस्थानचे राज्यपाल तथा ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत म्हणून दिले आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि सामाजिक योगदानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक केले. राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बागडे परिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त केली.