

जुनी ‘राजदूत’ आता इलेक्ट्रिक अवतारात! छत्रपती संभाजीनगरच्या युवकाची भन्नाट कामगिरी; ४२ हजारांत बनवली २०० किमी धावणारी बाईक
Sakal
बाळासाहेब काळे
करमाड : वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर पर्यायी ऊर्जेचा शोध घेत एका होतकरू युवकाने नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. सटाणा (ता. छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असलेले बालाजी प्रभाकर काकडे (वय ३२, मूळ रा. सुभानपूर, ता. भोकरदन, जि. जालना) यांनी अवघ्या २,५०० रुपयांत घेतलेल्या जुन्या भगार ‘राजदूत’ मोटरसायकलला पूर्णपणे इलेक्ट्रिक बाईकमध्ये रूपांतरित केले आहे. कमी खर्च, जिद्द आणि तांत्रिक कौशल्य यांच्या जोरावर त्यांनी ही कामगिरी साध्य केली असून, परिसरात त्यांच्या प्रयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे.
छायाचित्र:
करमाड-सटाणा येथे जुन्या ‘राजदूतसह स्पेलेण्डर, स्कूटी मोटरसायकलचे इलेक्ट्रिक बाईकमध्ये रूपांतर करताना तयार केलेला बॅटरी पॅक व प्रत्यक्ष वापरातील इलेक्ट्रिक बाईक.