Rajeshwar Niture : उदगिरात काँग्रेसला धक्का : निटुरे यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलणार

सात टर्म उदगीर नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषविलेले, उदगीर काँग्रेसचे दिग्गज नेतृत्व, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस राजेश्वर निटुरे यांनी शनिवारी (ता.३०) रोजी मुंबईच्या भाजप कार्यालयात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Rajeshwar Niture join bjp
Rajeshwar Niture join bjpSakal
Updated on

उदगीर, (जि.लातुर) : सात टर्म उदगीर नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषविलेले, उदगीर काँग्रेसचे दिग्गज नेतृत्व, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस राजेश्वर निटुरे यांनी शनिवारी (ता.३०) रोजी मुंबईच्या भाजप कार्यालयात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

उदगीर शहरात काँग्रेसचे एक भक्कम नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी उदगीर नगरपालिकेवर तब्बल चाळीस वर्षीपापासुन काँग्रेसची निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली होती. शिवाय विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही ते काँग्रेसचे हुकमी एक्का म्हणुन त्यांची ओळख होती.

माजी मुख्यमंत्री (कै) विलासराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांंचे विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्ते म्हणुन ते परिचित होते. त्यांनी शासनाचा अनेक महामंडळावर कार्य केले आहे.

श्री निटुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे उदगीरची राजकीय समीकरणे बदलणार आहेत.आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपला अधिक बळ मिळणार आहे. उदगीर मतदारसंघात भाजपच्या विजयी रथाला मोठा अडसर ठरणारा काँग्रेसचा नेता भाजपा मध्ये आल्याने भाजपला याचा नक्कीच फायदा होणार आहे.

लातूर जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाने अलीकडे काही दिवसात श्री निटुरे यांना निर्णय प्रक्रियेत न घेता जिल्हा बँक व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत परस्पर निर्णय घेतले असल्याने काँग्रेसमध्ये त्यांची घुसमट होत असल्याचे अनेक वेळा समाज माध्यमांवर त्यांनी व्यक्त केले होते.

काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमातील अनुपस्थिती त्यांची घुसमट होत असल्याचे जाणवत होते या पार्श्वभूमीवर त्यांनी हा भाजपमध्ये जाण्याचा अचानक निर्णय घेतल्याने उदगीर परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. आता त्यांच्या समवेत उदगीर काँग्रेस मधील कोण कोण भाजपमध्ये प्रवेश करेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

भाजपाला भक्कम नेतृत्व मिळेल...

गेल्या अनेक वर्षापासून उदगीर भाजप ही गटातटात विभागलेली आहे. त्यामुळे येथे सक्षम नेतृत्व नव्हते. उदगीर मतदार संघातील भाजपाचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत होते. कोणाचे नेतृत्व स्वीकारावे? हा मोठा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर पडला होता.मात्र श्री निटुरे यांच्या भाजपा प्रवेशामुळे उदगीर मतदार संघाला एक भक्कम नेतृत्व मिळू शकते. त्यांच्या नेतृत्वात पक्ष एकसंघ राहण्यास व पक्षवाढीस नक्कीच मदत होईल अशी शक्यता भाजप कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.