Killedharur Holi : जावयाची गाढवावर बसवून काढतात मिरवणूक; राजपूत समाजाची आहे अनोखी प्रथा

राजपूत समाजाकडून शहिदांच्या स्मृतीला उजाळा देत पेटवली जाते होळी; पाच दिवस चालतो कार्यक्रम.
holi in killedharur
holi in killedharursakal
Updated on

- ईश्वर खामकर

किल्लेधारूर (बीड) - तुम जिओ तो खेले फिर होली, सदा आनंद रहे द्वार, मोहन खेले होली हो’, ‘पापासिंगने नाम किया, एक धर्मवीर बलिदान हुआ’ अशा स्फूर्तीची गाणी गात शहिदांच्या स्मृतीला उजाळा देणारी अनोखी होळी राजपूत समाजाकडून धारूर शहरामध्ये साजरी करण्यात येते. पाच दिवस चालणाऱ्या या होळीत रंगाबरोबर गुलालाची उधळण करत राजपूत समाजाकडून ही होळी साजरी केली जाते.

या पाच दिवसाच्या दरम्यान प्रत्येक दिवशी एका कुटुंबाकडून रंगांची उधळण करण्याचे ठरवले जाते. कामासाठी बाहेर गावी असलेले सर्वच या उत्सवासाठी गावात परत येत असतात. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून शहरात ढोलकी, झांजाच्या सुरावर काढण्यात येणारी चाचर (फेरी) या पर्वातील महत्त्वाचे आकर्षण असते. पाच दिवस रंगोत्सव साजरा होणारे धारूर शहर जिल्ह्यातील एकमेव शहर आहे.

ज्याप्रमाणे धारूर शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे होळी सणालाही खूप मोठी जुनी परंपरा आहे. हा सण राजपूत समाजात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या पाच दिवसाच्या दरम्यान रात्रीच्या वेळी दहा ते दोन वाजेच्या दरम्यान गीते गायली जातात. वीररसाच्या गाण्यांसह देशभक्तिपर, कलात्मक, भक्तिगीतांचा यात समावेश असतो.

होळीच्या दिवशी सर्व परिवार एकत्र येत होळी पेटविली जाते. काही वेळ रंगाची उधळण होते. नंतर रात्री उशिरापर्यंत गाणी गायली जातात. धूलिवंदनापासून रंगपंचमीपर्यंत चाचर काढण्यात येते. चाचर म्हणजे सामुदायिक फेरी. यात राजपूत बांधव समाजाची परंपरा सांगणारी गीते गातात.

‘प्रथम सदा आनंद रहे रे द्वार, मोहन खेले होली हो’ असे म्हणत परिसरात दिसेल त्याच्यावर रंगांची उधळण केली जाते. रंग उधळण्याचे काम दरदिवशी एका कुटुंबाकडून केले जाते.पहिल्या दिवशी दुबे, दुसऱ्या दिवशी तिवारी, तिसऱ्या दिवशी मिश्रा, चौथ्या दिवशी हजारी व पाचव्या दिवशी सद्दीवाल कुटुंबाचा समावेश असतो.

रात्रीच्या वेळी काढण्यात येणाऱ्या चाचरीत रंगा ऐवजी गुलालाची उधळण केली जाते. हनुमान मंदिर येथील सूरू झालेली चाचर (फेरी) बालाजी मंदिरात शेवट होते. सायंकाळी दूध व इतर पदार्थांच्या मिश्रणापासून तयार केलेली ‘ठंडाई’ पिण्यासाठी इतर समाजालाही अगत्याने निमंत्रित करत होळी सण साजरा केला जातो.

शहरात माघील अनेक वर्षांपासूनची होळीची परंपरा आहे. हा सण सर्व समाज बांधव वक्तर येऊन मोठ्या उत्साहात साजरा कोरतोत या सणाला हुतात्म्यांचे विशेष महत्व आहे.

- रोहनसिंह हजारी (स्थानिक नागरिक)

चाचरनंतर जावयाची मिरवणूक

चाचर संपल्यानंतर जावयाला शोधून गाढवावर बसवून कटघरात मिरवणूक काढण्यात येते. रंग लावून नंतर सासऱ्याच्या घरी नेऊन नवे कपडे घालतात. दुपारनंतर ज्यांचा रंग असतो त्यांच्या घरी थंडाईचा कार्यक्रम असतो, या कार्यक्रमास सर्व समाजबांधवांना बोलावले जाते. सामाजिक एकतेचा मोठा संदेश देणारा येथील ऐतिहासिक होळी उत्सव शहराच्या वैभवात भर टाकणारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com