Korewadi Protest : राजश्री राठोड यांचे कोरडेवाडी तलाव मंजुरीसाठी आमरण उपोषण, ग्रामस्थांचा पाठिंबा; शनिवारी उपोषणाचा दुसरा दिवस
WaterCrisis News : कोरडेवाडी येथील साठवण तलावाला मंजुरी मिळावी यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्री राठोड यांनी पूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
केज : कोरडेवाडी येथील साठवण तलावाला मंजुरी द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्री राठोड यांनी शुक्रवारी (ता.४) कोरडेवाडी येथे बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे.