Raju Shetty: राज्य सरकार दलाली करतंय का: राजू शेट्टी
Bhum Farmers Protest: भूम तालुक्यात सुरू असलेल्या बेमुदत उपोषणात उपस्थित होते माजी खासदार राजू शेट्टी. त्यांनी राज्य सरकारवर ऊस उत्पादकांच्या बिलातून १५ रुपये कपात करून काही पैसे स्वतःकडे ठेवण्याचा आरोप केला आणि २०१९ चा कर्जमाफी निर्णय लवकर लागू करण्याची मागणी केली.
भूम: ‘राज्य सरकार दलाली करत आहे का’, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी भूम येथे कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित होऊन केला.