
Raju Shetty
sakal
लातूर : अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी. हे जमत नसेल तर किमान २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे तरी शेतकऱ्यांना मदत द्या. दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि सर्व सरकारी अधिकाऱ्यांची दिवाळी आम्ही सुरळीत होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.