कुंभार पिंपळगाव - नात्याला कोणतीही भाषा, जात, धर्म नसतो. जवळच्या नात्यापेक्षा कधी कधी मानलेले नातेही जीवनभर साथ देत असते. दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या एका महिला रूग्णाला डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे कोरोनाच्या काळात जीवदान मिळाले. .एकुलता एक भाऊ कोरोनाने गेल्यानंतर डॉक्टरला भाऊ मानून परतफेड म्हणून रूग्ण असलेली ही महिला बहिण डॉक्टरला धर्म बंधू समजुन गेल्या सहा वर्षांपासून राखी पौर्णिमेला किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी राखी बांधण्यासाठी न चुकता येते आणि ओवाळणीत आयुष्य दान दिलेल्या या डॉक्टरचे आभार मानते. शनिवारी (ता. नऊ) शिक्रापुर (जि. पुणे) येथील रहिवासी असलेल्या कविता संजय गोरे यांनी डॉक्टर आशिष राठोड यांना राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा केला..मुळच्या पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरच्या रहिवासी, माहेर बदनापूर जवळील जळगाव असलेल्या कविता गोरे त्यांना कोरोनाने हेरलं, त्यातच त्यांचा एकुलता एक भाऊ सोमनाथ धुळे कोरोनाने गेला. भावाच्या निधनाचे दुःख आणि त्यात झालेला कोरोना यामुळे कविता यांची तब्येत जास्तच खालवली..पुण्याहुन अक्कलकुवा, छत्रपती संभाजीनगरचे घाटी रूग्णालय, बदनापूर व त्यानंतर जालन्याच्या सामान्य रूग्णालयात उपचार घ्यावे लागले. कधी बेड मिळाला नाही तर कधी उपचाराला अडचण आली. डॉक्टर घरी जा म्हणत होते, त्यातच गावाकडची परिचारिका निता पोपळघट यांनी धीर दिला आणि डॉ. आशिष राठोड यांना विनंती करून नवजीवन हॉस्पिटल जालना येथे उपचार करण्यासाठी विनंती केली..यावर डॉ. आशिष राठोड यांनी त्यांना दवाखान्यात दाखल करून घेतले. त्यांचा सिटी स्कँनमध्ये स्कोअर होता २४, २५, श्वासही घेता येत नव्हता आणि ऑक्सिजन लावूनही फरक पडत नव्हता. डॉक्टरांच्या टिमने अशा स्थितीत गंभीर रूग्णाला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले.कविता यांचे पती, आई वडील, चार बहिणी अस कुटुंब एकीकडे चिंतेत होते तर दुसरीकडे मृत्यूशी झुंज देणाऱ्या कविताने बोलता येत नसले तरी कागदावर 'डॉक्टर तुम्ही प्रयत्न सुरू ठेवा, तुमची ही बहिण शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे' असे लिहल्याने डॉक्टरसह टिमचा उत्साह वाढला..४२ दिवस व्हेंटिलेटरवर काढले त्यानंतर ऑक्सिजन घेण्याच्या लायक झाल्या. २० ते २२ दिवस ऑक्सिजनवर काढत ७० दिवस कोरोनाशी लढा देऊन त्या थोड्या ठणठणीत झाल्या. २० दिवस जनरल वार्डात काढल्यानंतर त्यांना सुट्टी झाली. मागच्या पाच वर्षांपासून त्या दर राखी पौर्णिमेला जीवदान दिलेल्या डॉक्टरांना राखी बांधायला येतात..जीवनातील आनंदाचा क्षण (डॉ. आशिष राठोड, नवजीवन हॉस्पिटल जालना) -कोरोनाच्या काळात अनेक रूग्णांना जीवदान दिले. कविता गोरे सारखी बहिण मिळाली हा जीवनातील आनंदाचा क्षण आहे.ऋणानुबंधाच्या कुठुन पडल्या गाठी (कविता संजय गोरे, शिक्रापूर पुणे) -आम्ही चौघी बहिणी, वृध्द आई वडील, मजुरी करणारे पती अशी घरची परिस्थिती नाजुक. एकुलता एक भाऊ कोरोनात हिरावल्यानंतर डॉक्टर भावाने आधार देऊन मृत्युच्या दाढेतून वाचवले. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत या डॉक्टरचे उपकार विसरू शकणार नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.