

Water Conservation Initiative in Nilod
sakal
महेश रोडे
निल्लोड : जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या रामानंद संप्रदायाच्या वतीने सिल्लोड तालुक्यातील निल्लोड परिसरातील तपोवन परिसरात श्रमदानातून तीन वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरातील वाहत असलेले पाणी साठवून या भागातील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार असून, शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.