रामलीला मैदान नागरिकांसाठी लवकरच होणार खुले

रामलीला मैदान नागरिकांसाठी लवकरच होणार खुले
Summary

सर्वत्र उजाळा निर्माण होणार आहे. काही दिवसात हे मैदान नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. यासाठी वेळापत्रक भिंतीवर लावले जाणार असल्याचे श्री. जयवंशी यांनी सांगितले.

हिंगोली : येथील रामलीला मैदानाचे (Ramlila ground) सपाटीकरण करून तीन कोटी रुपयांच्या निधीतून येथे नागरिकांना फिरण्यासाठी ट्रैक (Track)उभारण्यात आला आहे. तसेच शुशोभीकरण करण्यात आले असून नागरिकांसाठी हे मैदान लवकरच खुले करुन देण्यात येणार आहे. शनिवारी (ता. २२) जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Collector Ruchesh Jayavanshi) यांनी मैदानाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. (Ramlila ground has been leveled and a track has been set up at a cost of Rs three crore)

रामलीला मैदान नागरिकांसाठी लवकरच होणार खुले
कुरुंदा येथील 'त्या' खून प्रकरणी माहिती देणाऱ्यास ५० हजारांचे बक्षीस

शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रामलीला मैदानावर यापूर्वी दसरा निमित्त विविध स्टाॅल व कार्यक्रम आयोजित केले जात होते. दसरा परंपरा असलेल्या या मैदानावर मागील १५० वर्षापेक्षा अधिक काळ कार्यक्रम व रावण दहन कार्यक्रम दसरा समिती मार्फत घेतले जात आहेत. यावर्षी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी रामलीला मैदानाचे सपाटी करण करण्याचा निर्णय घेतला. यावर तीन कोटी रुपयांचा खर्च करून संपूर्ण मैदानावर सपाटीकरण करून पाच किमीचा ट्रैक करण्यात आला, या ठिकाणी नागरिकांना फिरण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे, याशिवाय पालिकेने चार ठिकाणी हायमास्ट दिवे बसविले आहेत. त्यामुळे सर्वत्र उजाळा निर्माण होणार आहे. काही दिवसात हे मैदान नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. यासाठी वेळापत्रक भिंतीवर लावले जाणार असल्याचे श्री. जयवंशी यांनी सांगितले.

रामलीला मैदान नागरिकांसाठी लवकरच होणार खुले
नांदेड पोलिस दलाला पुन्हा हादरा; सहाय्यक फौजदाराचा कोरोनाने मृत्यू

तसेच रामलीला मैदानावर असलेले होमगार्ड यांचे कार्यालय पाडण्यात येणार असून त्या जागी ओपन जिम आणि नवीन पोलीस चौकी तयार करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे मैदानावर लावण्यात आलेल्या पाच हायमास्ट लाईटच्या पोल वर हाय क्वॉलिटिचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचे चित्रीकरण थेट पोलिस मुख्यालयातील कक्षात दिसणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मद्यपी किंवा गोंधळ घालणाऱ्यावर अंकुश ठेवता येणार आहे. तसेच या ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांसाठी शौचालयाची व्यवस्था देखील केली जाणार आहे. येत्या काही दिवसात लवकरच रामलीला मैदान नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. याशिवाय प्लॅट फॉर्म केला आहे. तो रामलीला कार्यक्रमासाठी व इतर सभा साठी याचा उपयोग होणार असून दिव्यांग लोकांना येथे जाण्यासाठी व्यवस्था केली असल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले. (Ramlila ground has been leveled and a track has been set up at a cost of Rs three crore)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com