
पाचोड : येथील रंजनाताई अशोकराव डोईफोडे यांनी बावीस एकर खडकाळ माळरानात ‘शून्य मशागत’ नैसर्गिक शेतीचे नंदनवन फुलवले आहे. अवघ्या दोन एकर जांभळाच्या (जांभूळ) बागेतून त्यांनी यंदा सव्वाचार लाखांचे उत्पन्न मिळवून परिसरातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श घालून दिला आहे.