Beed News : बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली असून, जिल्हा कारागृहात असलेल्या इतर आरोपींबाबत त्याने केलेल्या दाव्यांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ॲट्रॉसिटीसह विविध गुन्ह्यांमध्ये तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
बीड : पोलिस दलातून पोलिस उपनिरीक्षक पदावरून बडतर्फ आणि ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या रजणित कासले याची छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.