Jalna : ‘जालना जिल्हा मागास’ हा डाग आता पुसला गेला ; रावसाहेब दानवे : जिल्ह्याच्या विकासासाठी पत्रकारांनी कामे सुचवावीत

यापुढे निधीअभावी विकासाची कोणतीही कामे रखडणार नाहीत, अशी ग्वाही देतानाच पत्रकारांनी ही विकासाची कामे सुचवावीत, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे केले.
jalna
jalnasakal

जालना : नऊ वर्षांत जिल्ह्यामध्ये मूलभूत सुविधांसह विविध विकासकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा मागास हा डाग पुसला गेला आहे. यापुढे निधीअभावी विकासाची कोणतीही कामे रखडणार नाहीत, अशी ग्वाही देतानाच पत्रकारांनी ही विकासाची कामे सुचवावीत, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे केले.

शहरातील भारती लॉन्स येथे दर्पण दिनानिमित्त शुक्रवारी (ता.पाच) आयोजित सन्मान पत्रकारितेचा सत्कार पत्रकारांचा या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, जिल्हा माहिती अधिकारी प्रकाश धोंगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, उपाध्यक्ष भास्कर दानवे, भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत, पत्रकार अंकुशराव देशमुख यांची प्रमुख उपस्थित होते. यावेळी दानवे म्हणाले, जिल्ह्यात रस्त्यांचे काँक्रीटीकरण, विद्युतीकरण, आयसीटी, ड्रायपोर्ट आदी प्रकल्पांमुळे अमुलाग्र बदल झाले आहेत.

ड्रायपोर्टचे रूपांतर मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कमध्ये करण्यात आले आहे. जिल्ह्याची इतर जिल्ह्यांशी असलेली कनेक्टिव्हिटी वाढली तरच विकास हा गतीने होऊ शकणार आहे. मनमाड ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी ९६० कोटी रुपये मंजूर झाले आहे. शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ७३ कोटी रुपये आणले. यातून अंबड येथील फिल्टर बेडचे काम आणि घाणेवाडी जलाशयापासून शहरापर्यंत जलवाहिनी अंथरण्याचे काम केले जाणार आहे. विद्युत पुरवठ्यासाठी ५०० कोटी केंद्राकडून आणले. जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. ५० कोटींची रस्त्याची कामे लवकरच सुरू होणार आहेत.

जालना हे एकमेव शहर आहे ज्याला सिमेंट काँक्रीटचा बायपास लाभला आहे. आयसीटी इमारतीसाठी २५० कोटी रुपये आणल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी प्रमोद धोंगडे, राजेश राऊत यांची भाषणे झाली. कार्यक्रमात पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रा. सुरेश पुरी, प्रा. रेखा शेळके, प्रा.विजय कमळे, प्रा. परमेश्वर रासवे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांचा अल्प परिचय असलेले प्रदर्शन भरविण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक शेळके, राजेश भिसे, लक्ष्मण सोळुंके, दर्पण सकलेचा, गणेश काबरा, शेख मेहजबीन, दिनेश नंद, नरेंद्र जोगड, रवी जैस्वाल, मजहर सौदागर, श्रीकिशन झंवर आदींनी पुढाकार घेतला.

अनेक विषय आपल्याला वर्तमानपत्रांतूनच मिळत असतात. त्यामुळे विधानसभेमध्ये विषय मांडताना या वर्तमानपत्रांच्या बातम्यांचा आधार मिळतो. विविध प्रकारची माध्यमे आली तरी वृत्तपत्रांचे स्थान अढळ राहणार आहे.

— कैलास गोरंट्याल, आमदार, जालना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com