परभणीत विनाकारण फिरणाऱ्यांची दंडूक्यासह रॅपिड अॅन्टीजन टेस्ट

परभणी शहरात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रसार वाढत जात असतांना लोकांची बेफिकीर वृत्ती कमी होतांना दिसत नाही.
परभणी तपासणी
परभणी तपासणी

परभणी ः शहरात संचारबंदी लागू असतांनाही (Parbhani lockdown) शहरात विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या (no mask use in parbhani) शेकडो लोकांची धरपकड मोहिम सोमवारी (ता. १७) पोलिसांच्या वतीने राबविण्यात आली. विनाकारण फिरणाऱ्याची पोलिस व महापालिकेच्या पथकाच्यावतीने अॅन्टीजन टेस्ट करण्यात येत होती. दिवसभरात गांधी पार्क, जांब नाका या भागात पोलिसांनी शेकडो जणांवर कारवाई केली. (Rapid antigen test with baton of wanderers in Parbhani)

परभणी शहरात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रसार वाढत जात असतांना लोकांची बेफिकीर वृत्ती कमी होतांना दिसत नाही. त्यामुळे शहर पोलिसांनी कडक भूमिका घेण्याचे ठरवले आहे. सकाळी ११ नंतर घराबाहेर पडून विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे. कामाचे कारण दाखवून गाडीवरुन या भागातून त्या भागात लोकांची वर्दळ सुरुच आहे. त्यामुळे सोमवारी (ता. १७) सहायक पोलिस अधिक्षक अविनाशकुमार यांच्यासह नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या पथकाने शहरातील अश्या विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाईचा बडगा उगारला.

हेही वाचा - रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या संकटात वाढ; केंद्र सरकारने दरवाढ मागे घेण्याची मागणी

सोमवारपासून शहरात किराणा दुकान, भाजीपाला व फळविक्रेत्यांना सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत विक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सकाळी ११ पर्यंत लोकांना खरेदीसाठी घराबाहेर पडता येते. परंतू ११ नंतर संचारबंदी परत सुरु होत असूनही अनेक जण घराबाहेर पडत रस्त्यावर गर्दी करतांना दिसत होते. त्यामुळे सोमवारी पोलिसांनी या बाबत कडक भूमिका बजावत कारवाईस सुरुवात केली. ११ नंतर बाहेर पडणाऱ्यांना अडवून त्यांची चौकशी केली जात होती. ज्यांचे अत्यावश्यक काम नसले अश्यांना जागेवरच रॅपिड अन्टीजन चाचणी करण्यात येत होती. त्यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. दिवसभरात शेकडो लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या.

नागरीकांची पोलिसांसी हमरीतुमरी

विनाकारण फिरणाऱ्या लोकांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी मोहिम राबविली. परंतू काही ठिकाणी नागरीकाकडून पोलिसांना हमरीतुमरीचे प्रकार ही घडले. त्यामुळे पोलिसांनी कडक भूमिका घेत कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे अल्पावधीतच रस्त्यावरील गर्दी नाहीशी झाली.

नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. फार अत्यावश्यक काम असेल तर घराबाहेर यावे. प्रशासनाने दिलेल्या वेळेतच खरेदीसाठी घरातील एका सदस्यानेच खरेदीसाठी बाहेर यावे. पोलिसांची कारवाई सुरु आहे. त्यामुळे घरात राहून स्वताची व कुटूंबाची काळजी घ्यावी.

- कुंदनकुमार वाघमारे, पोलिस निरीक्षक, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com