cow birth four calves
sakal
वाशी - सटवाईवाडी, ता. वाशी येथे पंक्रोशीत यापूर्वी कधीही न पाहिलेली दुर्मीळ आणि आश्चर्यकारक करणारी घटना घडली आहे. येथील माजी सैनिक व सध्या शेती व दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी सुरेश फरताडे यांच्या सांभाळाखाली असलेल्या एका गायीने रविवार (ता. आठ) रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी चार वासरांना जन्म दिला. विशेष म्हणजे या प्रसूतीत गाय तसेच चारही वासरे पूर्णपणे सुखरूप आहेत.