वीस हजार मृतदेहांचे शवविच्छेदन, चिरफाड करताना यायचे अंगावर..

लातूर : रशीद शेख यांचा ‘कुराण’ ग्रंथ भेट देऊन सत्कार करताना त्र्यंबक स्वामी. यावेळी अमर बुरबुरे, सोमनाथ जाधव, हनुमंत पडवळ, बाबा शेख, सज्जाद शेख आदी.
लातूर : रशीद शेख यांचा ‘कुराण’ ग्रंथ भेट देऊन सत्कार करताना त्र्यंबक स्वामी. यावेळी अमर बुरबुरे, सोमनाथ जाधव, हनुमंत पडवळ, बाबा शेख, सज्जाद शेख आदी. सकाळ

लातूर : जिल्हा रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Medical College) शवविच्छेदन गृहाकडे (Post Mortem) जायचे म्हटले तरी अनेकांचे पाय थरथरतात. पण, आयुष्याची ३१ वर्षे अशा शवविच्छेदनगृहात काम करणे किती कठीण असते. हे कामही सेवा म्हणून केले त्यांचे नाव आहे, रशीद शेख. आपल्या सेवाकाळात श्री. शेख यांनी वीस हजारांपेक्षा जास्त शवविच्छेदन केले. सुरवातीच्या काळात मृतदेहाची चिरफाड करताना अंगावर शहारे यायचे. पण, नंतर मात्र हे काम त्यांच्या ड्यूटीचाच एक भाग बनला. येथील रशीद शेख यांचे शिक्षण अवघे तिसरी पास. घरची परिस्थिती तशी बेताचीच. नोकरी करणे भागच होते. त्यामुळे तिसरी झाल्यानंतर नोकरीचा शोध सुरू झाला. यात १९८३ मध्ये जिल्हा रुग्णालयात (Latur) सफाईगारच्या जागा निघाल्या. सफाईगार त्यात जिल्हा रुग्णालयासारखे ठिकाण त्यामुळे नोकरीसाठी फारसे कोणी येत नव्हते. त्यामुळे श्री. शेख यांना ही नोकरी मिळाली. सुरवातीचे दोन-तीन वर्षे रुग्णालयाच्या वॉर्डात सफाईगार म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर श्री. शेख यांची वर्णी शवविच्छेदनगृहात लागली.

लातूर : रशीद शेख यांचा ‘कुराण’ ग्रंथ भेट देऊन सत्कार करताना त्र्यंबक स्वामी. यावेळी अमर बुरबुरे, सोमनाथ जाधव, हनुमंत पडवळ, बाबा शेख, सज्जाद शेख आदी.
समोरील दृश्याने कुटुंबियांनी फोडला हंबरडा, आवाजाने शेजारी धावले

शवविच्छेदनगृहात कटर हे पद असते. पण, येथील रुग्णालयात हे पदच नाही. त्यामुळे श्री. शेख यांना तेथे पाठवण्यात आले होते. वॉर्डात काम करणे वेगळे आणि शवविच्छेदनगृहात काम करणे हे वेगळे होते. तेथे मृतदेहाची चिरफाड करावी लागणार होती. सुरवातीच्या काळात त्यांचे मन चलबिचलही झाले. पण, ड्यूटी करावी लागणारच म्हणून त्यांनी हे काम सुरू केले. पहिले काही महिने मृतदेहाची चिरफाड करताना श्री. शेख यांच्या अंगावर शहारे यायचे, भीतीही वाटायची. नंतर मात्र हे काम त्यांच्या सेवेचाच एक भाग बनले. श्री. शेख यांनी मृतदेहाची चिरफाड केल्यानंतरच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पुढे तपासणी व्हायची. त्यामुळे श्री. शेख यांचे काम फार महत्त्वाचे व जिकिरीचे होते. त्यांनी ३८ वर्षे नोकरी केली. यापैकी ३१ वर्षे त्यांनी मृतदेहांचे शवविच्छेदन केले. एका-एका दिवशी तर आठ ते नऊ मृतदेहांचे शवविच्छेदनही त्यांना करावी लागली. आपल्या कार्यकाळात वीस हजारांपेक्षा जास्त शवविच्छेदन त्यांनी केली आहेत. या कार्यातून ते आता सेवानिवृत्त झाले आहेत.

लातूर : रशीद शेख यांचा ‘कुराण’ ग्रंथ भेट देऊन सत्कार करताना त्र्यंबक स्वामी. यावेळी अमर बुरबुरे, सोमनाथ जाधव, हनुमंत पडवळ, बाबा शेख, सज्जाद शेख आदी.
'औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला, महापौर शिवसेनेचाच'

शिवसेनेकडून ‘कुराण’ भेट

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेले श्री. शेख जुलैअखेरीस सेवानिवृत्त झाले. महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करून निरोप देणे आवश्यक होते. पण, प्रशासनाने त्यांचा साधा सत्कारही केला नाही. हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते व या महाविद्यालयाच्या अभ्यागत समितीचे अशासकीय सदस्य त्र्यंबक स्वामी यांनी श्री. शेख यांचा ‘कुराण’ ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे अमर बुरबुरे व सोमनाथ जाधव, फेरीवाला व्यावसायिक सेनेचे जिल्हा प्रमुख हनुमंत पडवळ, बाबा शेख, महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक सेनेचे जिल्हा सचिव बंडुसिंग भाट, सज्जाद गफार शेख, खाजा इस्माई, खाजाभाई शेख उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com