

छत्रपती शिवाजी चौकात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थित रस्ता रोको आंदोलन करून कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले
कळंब (उस्मानाबाद): भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या विधानामुळे मंगळवारी (ता.२४) छत्रपती शिवाजी चौकात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थित रास्ता रोको आंदोलन करून कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात कळंब शहरात शिवसेना व युवा सेना यांच्या वतीने रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. कळंबच्या पोलिस ठाण्यात याबाबत शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांनी फिर्याद दिली आहे.
कळंब येथील छत्रपती शिवाजी चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणा बाजी करण्यात आली. शिवसैनिक आक्रमक झाले होते, या आंदोलनात खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, युवा सेनेचे संपर्क प्रमुख नितीन लांडगे, शहर प्रमुख प्रदीप मेटे, उपतालुका प्रमुख भारत नाना सांगळे, सागर बाराते, ॲड. मंदार मुळीक, डॉ.रुपेश कवडे, भैय्यासाहेब खंडागळे, दादा खंडागळे, युवा सेनेचे शहर प्रमुख गोविंद चौधरी, अजित गुरव , रुकसना भाभी बागवान, गजानन चोनदे, अनिल पवार, हर्षद अंबुरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हजर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.