राष्ट्रवादीतर्फे वैजापूरला "रास्ता रोको'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

महाराष्ट्र राज्य शिखर बॅंक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांचा काही संबंध नसताना त्यांना अडकविण्याच्या प्रकराचा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तालुका व शहर शाखेच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

वैजापूर (जि.औरंगाबाद) ः महाराष्ट्र राज्य शिखर बॅंक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांचा काही संबंध नसताना त्यांना अडकविण्याच्या प्रकराचा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तालुका व शहर शाखेच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

येत्या काळात गावागावांत या आंदोलनाची तीव्र पडसाद उमटतील असा इशारा श्री. चिकटगावकर यांनी बोलताना दिला. या आंदोलनात तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोसले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिनकर पवार, उपसभापती प्रभाकर बारसे, बाजार समितीचे संचालक भागीनाथ मगर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय पाटील चिकटगावकर, माजी उपसभापती ऍड. प्रतापराव निंबाळकर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र मगर, रिखबचंद पाटणी, साईनाथ मतसागर, गणेश चव्हाण, उत्तम निकम, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सुराशे, महिला आघाडीच्या सुनीता साखरे, तालुका कार्याध्यक्ष धीरज राजपूत, शहराध्यक्ष प्रेम राजपूत, बिपीन मगर, उमेश नाईकवाडी, गणेश पवार, राजेंद्र कराळे, संजय जाधव, केशव मोरे, अहिलाजी डमाळे, चंद्रकांत गायकवाड, अविनाश रोकडे, सागर गायकवाड, अमोल बावचे, मयूरेश जाधव, बापू साळुंके, रवींद्र निकम, संकेत चुडीवाल सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rasta Roko By Nationalist Congress In Vaijupur