धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी रास्ता रोको

केशव गायकवाड
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

धनगर आरक्षण कृती समितीचे राज्य समन्वयक उत्तम जानकर, गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत धनगर समाजातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मेंढ्यांना रस्त्यावर आणून उभा करण्यात आले होते.

इटकळ : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता.8) पुणे- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर इटकळ (जि. उस्मानाबाद) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मेंढ्या घेऊन धनगर समाजातील नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.

धनगर आरक्षण कृती समितीचे राज्य समन्वयक उत्तम जानकर, गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत धनगर समाजातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मेंढ्यांना रस्त्यावर आणून उभा करण्यात आले होते. ३१ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या मोर्चापूर्वी सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जानकर, पडळकर यांची भाषणे झाली.

दुपारी पावणेबाराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनाला सुरवात केली. दीड तास हे आंदोलन सुरू होते. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजिवन मिरकले यांना मागण्यांचे निवेदन दिले.

Web Title: Rasta Roko for reservation on behalf of Dhangar community