

Ration Distribution Scam Allegations Emerge Over Arbitrary Changes in Beneficiary Lists and EPOS System in Maharashtra
sakal
छत्रपती संभाजीनगर: ‘मी १९८० पासून रेशन दुकानदार आहे. आजवर ४० वर्षांत या व्यवस्थेतले सर्वच खाचखळगे खात डिजिटलायझेशनपर्यंत पोचलो. सध्या केंद्र, राज्याने या व्यवस्थेत ई-पॉस मशीनमुळे सर्व व्यवहार पारदर्शक होत असल्याचा दावा केला. पण, त्यातच खरा घोटाळा होत आहे, पूर्वी नावे वगळण्यासोबत कारणही द्यावे लागत असे. पण, आता डिजिटलामध्ये विनाकारण नावे उडवता येतात, असे एका रेशन दुकानदाराने ‘सकाळ’ला सांगितले. पुरवठा विभाग पाहिजे तेव्हा लाभार्थींची नावे कमी करू शकतो आणि पाहिजे तेव्हा ॲड करू शकतो, अशी पुष्टीही दुकानदाराने जोडली.