राहुल गुप्ता उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे नवे सीईओ

जिल्हा परिषद, उस्मानाबाद
जिल्हा परिषद, उस्मानाबाद
Summary

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेल्या डॉ. फड यांना जेमतेम एक वर्षाच्या कार्यकाळातच बदलून जावे लागले आहे.

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या Osmanabad Zilla Parishad अधिकारीपदाची खांदेपालट झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. विजयकुमार फड IAS Vijaykumar Phad यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर गडचिरोली येथील अहेरीचे उपविभागीय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी राहुल गुप्ता IAS Rahul Gupta येत आहेत. श्री. गुप्ता येत असल्याने जिल्ह्याला दोन आयएएस अधिकारी लाभत आहेत. त्यामुळे विकासाचा गाडा वेगात धावण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांतून होत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेल्या डॉ. फड यांना जेमतेम एक वर्षाच्या कार्यकाळातच बदलून जावे लागले आहे. त्यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळात ‘सुंदर माझे कार्यालय, कोरोना काळातील माझे गाव, माझी जबाबदारी’ या मोहीम चांगल्याच प्रभावी ठरल्या होत्या. प्रशासनावर त्यांची मोठी पकड होती. थेट कार्यक्षेत्रावर जाऊन काम करण्यात त्यांची आवड होती. प्रत्यक्ष काय घडत आहे, हे जाणून त्यांनी निर्णय घेतले. आता नव्याने येत असलेले गुप्ता थेट आयएएस झालेले आहेत. ते २०१७ मध्ये आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाले. सध्या गडचिरोली Gadchiroli जिल्ह्यातील अहेरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शिवाय अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणूनही ते काम पाहत होते. त्यांचा अनुभव कमी असला तरी त्यांनी नक्षल प्रदेशात Naxalite Area काम केले आहे.raul gupta news ceo of osmanabad zilla parishad

जिल्हा परिषद, उस्मानाबाद
BAMU : ‘पेट’चा दुसरा टप्पा सुरु, १५ दिवस मुदतवाढ

अनेक वर्षानंतर आयएएस जोडी

जिल्ह्याला अनेक वर्षानंतर थेट आयएएस जोडीदार लाभत आहेत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हेरी थेट आयएएस दर्जाचे अधिकारी आहेत. त्यात आता राहुल गुप्ता हे थेट आयएएस अधिकारी म्हणून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्याला आता दोन आयएएस अधिकारी लाभले आहेत. अनेक वर्षांनंतर जिल्ह्यात दोन्ही आयएएस दर्जाचे अधिकारी मिळत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com