‘कोरोना’ची भीती असलेल्यानेच केला डॉक्टरांवर आरोप, कसा आणि काय घडले ते वाचा 

शिवचरण वावळे
रविवार, 29 मार्च 2020

नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात शनिवारी (ता.२८) सायंकाळी चारच्या सुमारास एक व्यक्ती ‘कोरोना’ टेस्ट साठी गेली असता कोरोना वॉर्डात नाव नोंदणी लक्षणे व चौकशी करून एक्स रे विभागात पाठविण्यात आले. एक्स रे काढून परत पन्नास नंबरच्या ‘कोरोना’ कक्षाकडे आलो तर सारे डॉक्टर अक्षरशः पळून जात होते, असा गंभीर आरोप विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात कोरोना कक्षातील डॉक्टरांवर एका व्यक्तीने केला आहे. 

नांदेड : नांदेडची एक व्यक्ती मार्चमध्ये संत रविदास महाराज जयंतीसाठी उत्तर प्रदेश राज्यात गेली होती. (ता.१०) मार्चला शहरात परतल्याने त्यास सर्दीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना ‘कोरोना’ची लागण तर नाही झाली ना या भीतीने ते विष्णुपुरी येतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेले होते. मात्र, शनिवारची सुट्टी असल्याने रुग्णालयात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. बहुतेक डॉक्टर सुट्टीवर होते, त्यांच्या जागेवर वरिष्ठ निवासी डॉक्टर होते.

अशा स्थितीत त्या ठिकाणच्या वरिष्ठ निवासी डॉक्टरने त्यांची कोरोना संबंधी स्वॅब घेऊन प्राथमिक तपासणी केली, त्यानंतर ट्रॅव्हल हिस्ट्रीबद्दल विचारपूस केली व निम्योनिया आजार तर नाही ना हे बघण्यासाठी पुढे एक्स रे काढण्यास पाठविले होते. त्यात कुठलेही लक्षण नसल्याने त्यास घरच्या घरी होम क्वॉरंटाईन करण्याची सूचना देण्यात आली. परंतु, घाबरलेल्या त्या व्यक्तीस ‘कोरोना’ची भीती मनातुन काही जात नव्हती. 

 हेही वाचा- Video - खासदार चिखलीकरांनी दिला एक कोटींचा निधी

‘कोरोना’ची लक्षणे नसल्याचा डॉक्टरांचा दावा-
तेव्हा उद्विग्ण झालेल्या त्या व्यक्तीने थेट रुग्णालयात मला बघताच डॉक्टर पळुन गेल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांनाच सोशल मीडियाद्वारे पत्र लिहून दिवसभरात घडलेली हकीकत कथन केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मेसेजमध्ये त्या व्यक्तीने नाव, पत्ता आणि मोबाईल नंबरसह माहिती दिली आहे. परंतु, ‘सकाळ’ने त्या संबंधित व्यक्तीशी दिवसभरात अनेक वेळा संपर्क करून देखील त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा संबंधीत डॉक्टरांकडून घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती घेण्यात आली. तेव्हा मात्र त्या व्यक्तीस ‘कोरोना’ची कुठलीही लक्षणे नाहीत. कोरोनाची भीती मनातुन जात नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.   

हेही वाचले पाहिजे-  ‘सकाळ’मुळे आई-मुलाची झाली भेट

 

 

कोरोना बाधितांसाठी ५० बेडची व्यवस्था
कोरोना बाधितांसाठी ५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी विशेष डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. जिम्मेदार डॉक्टर आपल्या कर्तव्यापासून पळुन जाऊच शकत नाही. जर एखाद्या रुग्णास कोरोना संदर्भात जी लक्षणे असायला हवीत, ती लक्षणे नसतील तर त्यांना घरी काढुन दिले जाते. लक्षणे असतील तर, कक्षात ॲडमीट करुन घेतले जाते. 
-संजय मोरे (कोरोना समन्वयक)

 

संबंधिताची कोरोना चाचणी घेतली जाणार
ज्या व्यक्तीने मला फोन केला होता. त्यांना मी चांगले ओखळतो. त्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली. परंतु, त्यांच्या मनातली शंका गेली नाही. म्हणून त्यांना श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून त्यांची कोरोना संदर्भात चाचणी घेतली जाणार आहे.
डॉ. एस. आर. वाकोडे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read about the accusations, how and what happened to doctors who feared 'corona'