शिव चरित्रातुन पन्नास वर्षाचे नियोजन कसे ते वाचा

Nanded Photo
Nanded Photo

नांदेड : शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली म्हणजे त्यांचे विचार आपल्यात येतात असे नाही. त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवचरित्र समजून घेणे गरजेचे आहे. जोपर्यंत शिवचरित्र समजून घेणार नाहीत, तोपर्यंत शिवाजी महाराजांचे विचार आपल्यात पूर्णपणे कळणार नाहीत. शिवाजी महाराजांच्या आत्मचरित्रातून पुढील पन्नास वर्षाच्या नियोजनाचा मार्ग कळेल, असे मत राजमाता जिजाऊ सिनेमात मॉ जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्रा. डॉ. स्मिता देशमुख यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने प्रा. डॉ. देशमुख यांचे बुधवारी (ता.१९) जाहीर व्याख्यान झाले. या वेळी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी प्राचार्य रेणुका मोरे, संतोष देवराये, गुट्टे अकॅडमीचे संचालक सुभाष गुट्टे यांची उपस्थिती होती. पूर्वी बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो असे गांधीजींची तीन माकडे सर्वांना माहिती होती. आता या तीन माकडात मोबाईल नावाच्या चौथ्या माकडाची भर पडली आहे.

मोबाईलमळे संस्कार बिघडले-
मोबाईलमुळे आजच्या पिढीवर नको ते संस्कार होत आहेत. कामाच्या गोष्टी कमी आणि बिनकामाच्या गोष्टीच्या शिक्षणाकडे आजची पिढी ओढली जात आहेत. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राचे वाचन करावे. त्यातून विद्यार्थ्यांना पुढील पन्नास वर्षाच्या नियोजनाचा मार्ग सापडेल. इतकी मोठी ताकद महाराजांच्या चरित्रात आहे.
 
 हेही वाचा- १०० देशांचा कार प्रवास करणारा अवलिया नांदेडात

असे घडले शिवाजी महाराज-
शिवाजी महाराजांच्या मागे पुढे सैन्यांचा फौजफाटा असताना देखील त्यांनी विविध कला शिकल्या. वयाच्या सहाव्या वर्षापासून कुणाच्याही मदतीविना अडचणीवर मात करण्याची कला राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांच्या अंगी रुजविली होती. त्यामुळे भविष्यात ते एक महान पराक्रमी राजे होऊ शकले. शिवाजी महाराजांना समजून घेण्यापूर्वी राजमाता जिजाऊ समजून घ्या. घरातच नव्हे, तर घराबाहेर देखील महिला आणि मुलींचा आई बहिणीप्रमाणे आदर करायला शिका. जिजाऊंनी शिवरायांना सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे रयतेमध्ये मिळून मिसळून वागण्याचा सल्ला दिला. 

महाराजांचे गुणगाण गाताना स्वतःची वेगळेपण जपा-
तुमच्या विचारांची ताकद वाढवा. शिवाजी महाराजांना, मॉं जिजाऊ आणि संभाजी राजेंना अनेक भाषा येत होत्या असे आपण इतराना सांगतो. जरूर सांगा पण आपल्याला काय येते हे पण सांगता आले पाहिजे. शिवाजी महाराजांचे शिवचरित्र हे माणसावर प्रेम करायला शिकवते. जिजाऊच्या संस्काराशिवाय या मातीला पर्याय नाही, असेही त्या म्हणाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com