१०० देशांचा कार प्रवास करणारा अवलिया नांदेडात 

फोटो
फोटो

नांदेड : गुरु नानक देव यांच्या ५५० व्या प्रकाश पर्व अंतर्गत कानपूरचे ६१ वर्षीय उद्योगपती अमरजितसिंह चावला श्री हजुर साहिब नांदेडला पोहोचल्याबद्दल गुरुद्वारा बोर्डाने यांचे स्वागत केले. ते गुरू नानक देव यांचे मानवतावादी विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कार यात्रा करत आहेत. सरदार चावला यांनी पहिल्या टप्प्यात पाकिस्तान, म्यानमार, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका या देशातून धर्मप्रचार करत ते नांदेड सचखंड भूमीत मंगळवारी (ता. १८) पोहचले. त्यांनी या प्रवासादरम्यानची सविस्तर माहिती दिली. ते आपल्या पत्नीसह ही कारमधून यात्रा करत आहेत. 


सरदार अमरजीतसिंग सचखंड गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना केली. याप्रसंगी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने त्यांचे स्वागत केले. दोन लाख किलोमीटरचा प्रवास करण्याची इच्छा असलेल्या अमरजीतसिंग म्हणाले की, आपण जगभर प्रवास करनार असून गुरु नानक देव यांच्या विचाराच्या संदेशांचा प्रचार करत आहे. ते म्हणाले की गुरु नानक देव यांनी २८ वर्षे पायी प्रवास केला. त्यावेळी दळणवळणाची कुठलीच सोय नव्हती मात्र आता ती सर्व सुविधा उपलब्ध झाली असल्याने पहिल्या टप्प्यात त्यांनी शेजारील देश पाकिस्तान, नेपाळ, भूतान, म्यानमार, श्रीलंका यासह अनेक देशांचा प्रवास केला. पुढे ते म्हणाले की, गुरु नानक देवजी माणुसकीचा संदेश घेऊन ज्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी मी जात असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु या सर्व संकटावर मात करण्याची शक्ती गुरूनानक देवजी देत आहेत. 

श्री गुरू अंगद निवासमध्ये स्वागत 

येथील सचखंड गुरूद्वारा व्यवस्थापन समितीचे सचिव सरदार रविंद्रसिंग बुंगई, प्रशासकीय अधिकारी सरदार डी. पी. सिंह चावला, गुरूद्वारा बोर्डाचे अधीक्षक सरदार गुरविंदरसिंग वाधवा, जनसंपर्क अधिकारी रविंद्रसिंग मोदी आणि मंडळाचे सदस्य आदी अधिकारी सरदार अमरजितसिंग यांचे गुरू अंगद निवासमध्ये स्वागत केले.

१०० देशांचा प्रवास केला जाणार आहे

हा प्रवास दिल्ली येथून चार जुलै २०१९ रोजी सुरू करण्यात आला आहे. दोन लाख किलोमीटर आणि १०० देशांचा प्रवास केला जाणार आहे. गुरु नानकदेवजींचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला जाईल असे ते म्हणाले. प्रवासाचा पहिला टप्पा चार जुलै २०१९ रोजी दिल्लीपासून सुरू झाला आणि आतापर्यंत शेजारच्या सहा देशांचा प्रवास करत ४४ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. ता. पाच मार्च २०२० रोजी दिल्लीत संपेल.

कारसह विजा घेऊन प्रवास सुरू

पाकिस्तानमधून पुढे जाण्यासाठी कारचा व माझा विजा मिळविणे मला खूप सुरवातीला त्रास झाला. माझे ध्येय व तळमळ पाहता कारचा विजा मिळवत मला पाकिस्तान सरकारने जाण्यास संधी दिली. कारण प्रवासात काहीही होऊ शकते. त्याचे परिणाम देशांतर्गत बाबीवर पडू शकतात म्हणून त्यांनी माझी सर्व माहिती घेत परवानगी दिली. काही देशात जाण्यासाठी समुद्रमार्ग लागतो. तेंव्हा ही कार जहाजामध्ये सिफ्ट केल्या जाते. कारसह विजा मिळविणे ही बा खरोखरच अवघड बाब आहे.   
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com