
नवीन नांदेड ः ‘कोविड-१९’ योद्धांसाठी ‘स्वारातीम’ विद्यापीठातर्फे दोन ‘निर्जंतुकीकरण वाहन’ सेवेत दाखल करण्यात आली आहेत. सदर वाहने शहरातून प्रत्येक ठिकाणी जाणार आहेत. त्या ठिकाणी पॉइंटवर उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांना या वाहनांमध्ये दहा सेकंद सॅनिटायझर द्रव्याचा फवारा त्यांच्या सर्वांगावर पडणार आहे. जेणेकरून त्यांच्या कपड्यासाहित सर्वांगाचे निर्जंतुकीकरण होणार आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे ‘कोविड-१९’ कोरोना योद्धांसाठी म्हणजे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पोलिस, नर्स, ब्रदर्स आदींना कोरोना या संसर्गजन्य विषाणूपासून बचाव करण्यासाठी दोन ‘निर्जंतुकीकरण वाहन’ नांदेड शहरामध्ये सेवेत दाखल झाले आहे.
रविवारी झाले वाहनांचे उद्घाटन
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी रविवारी (ता. १२) वाहनांचे उद्घाटन करून सेवेसाठी नांदेड शहरामध्ये पाठविले. या वेळी कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने, डॉ. शैलेश वाढेर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा मुंगळ, डॉ. जी. बी. झोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कपड्यासाहित सर्वांगाचे निर्जंतुकीकरण होणार
शहरामध्ये अनेक कोरोना योद्धे स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. त्यांच्यासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या कल्पनेतून निर्जंतुकीकरण करणारी वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. सदर वाहने शहरातून प्रत्येक ठिकाणी जाणार आहेत. त्या ठिकाणी पॉइंटवर उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांना या वाहनांमध्ये दहा सेकंद सॅनिटायझर द्रव्याचा फवारा त्यांच्या सर्वांगावर पडणार आहे. जेणेकरून त्यांच्या कपड्यासाहित सर्वांगाचे निर्जंतुकीकरण होणार आहे.
विविध संघटनाही कार्यरत
‘कोरोना’ या संसर्गजन्य विषाणूने जगभर मृत्यूचे थैमान घातले आहते. भारत व महाराष्ट्रही याला अपवाद नाही. ‘कोरोना’ या संसर्गजन्य विषाणूच्या प्रतिकारासाठी केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा प्रशासन या सोबतच निमशासकीय आणि सामाजिक संस्थाही प्रयत्न करीत आहेत. ‘कोविड-१९’ विरोधी लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वाहन देण्यात आलेले आहेत. यासाठी विद्यापीठातील कर्मचारी व्यंकटराव हंबर्डे, शिवाजी हुंडे, शैलेश कांबळे, संतोष हंबर्डे हे परिश्रम घेत आहेत. या वेळी श्याम जाधव, शिवराम लुटे, गोविंद हंबर्डे, गणपत लुटे, प्रीतम भराडिया, पांडुरंग सूर्यवंशी, जयकिशन बागडी, गोविंद सोनटक्के, निसार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.