एलआयसीचा हा विभाग पॉलिसी वितरणात देशात अव्वल- कोणता चे वाचा

Nanded Photo
Nanded Photo

नांंदेड : भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) हे सर्वसामान्यांंच्या पसंतीस उतरलेले आणि मागील ६४ वर्षांपासून जनतेच्या मनात विश्वासाचे नाते निर्माण केलेल्या एलआयसीचे देशभरात ११३ विभाग आहेत. यातील नांदेड विभागाने जानेवारी २०२० अखेर ९७ हजार पॉलिसी वितरण करून देशात अव्वल स्थान काबीज केले आहे.

इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीएआय) ही संस्था भारतातील कार्यरत सर्व विमा कंपन्यांचे नियंत्रण करत असते. या संस्थेने जीवन विमा जीवन, विमा योजनेच्या रेग्युलेशन्समध्ये ता. एक फेब्रुवारी २०२० पासून काही बदल अमलात आणले आहेत. या अनुषंगाने देशातील सर्वात मोठी आणि सरकारी जीवन विमा कंपनी म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळाने आपल्या सर्व योजनांमध्ये आवश्यक ते बदल करत नवीन योजना फेब्रुवारीपासून सादर केल्या आहेत.

वर्षभरात एक कोटी ९६ लाख दहा हजार २९९ नवीन पॉलिसीची विक्री
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या जुन्या लोकप्रिय योजना ता. ३१ जानेवारीपर्यंत उपलब्ध होत्या. जानेवारी महिन्यामध्ये या सर्व योजनांना देशभरामध्ये विक्रमी प्रतिसाद लाभल्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाने अखिल भारतीय स्तरावर अतिशय उत्तम कामगिरी केली. चालू आर्थिक वर्षामध्ये ता. एक एप्रिल ते ३१ जानेवारी अखेरपर्यंत महामंडळाने एक कोटी ९६ लाख दहा हजार २९९ नवीन पॉलिसी विकून सुमारे तीस टक्के वृद्धी नोंदविली आहे. ता. ३१ जानेवारी २०२० अखेर महामंडळाचे मार्केट शेअर पॉलिसी बेसिसवर ८६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. महामंडळाने ता. ३१ जानेवारी २०२० अखेर एक लाख ५० हजार ५०५ कोटी रुपये प्रथम वर्ष विमा हप्ता गोळा करून यामध्ये सुद्धा ४२ टक्क्यांची वृद्धी नोंदविली आहे. प्रथम वर्ष विमाहप्तामध्ये सुद्धा महामंडळाचे शेअर मार्केट ७० टक्के आहे.

विभागीय प्रबंधक जनार्दन लामतुरे यांच्या कार्याचा गौरव
महामंडळाच्या नांदेड विभागाने सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये विक्रमी अशा ३० हजार पॉलिसी करण्याचा विक्रम पूर्ण केला. १५३ टक्के वृद्धीदर नोंदविला आहे. ता. एक एप्रिल ते ता. ३१ जानेवारी महिनाअखेर नांदेड विभागाच्या ९७ हजार ६९९ नवीन पॉलिसी पूर्ण झाल्या असून पॉलिसीवर विभागाने ४१ टक्के वाढ नोंदविली आहे. अखिल भारतीय स्तरावर नांदेड विभागाने पॉलिसी बेसिसवर पहिला क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीमुळे नांदेड विभागाचे विभागीय प्रबंधक जनार्दन लामतुरे यांचा नुकताच लोणावळामध्ये पार पडलेल्या क्षेत्रीय स्तरावरील सभेमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या पुढे नांदेड विभाग अशीच कामगिरी करेल
‘आयआरडीए’च्या नवीन रेग्युलेशन्सनुसार आलेले नवीन प्रोडक्टसुद्धा ग्राहकोपयोगी आहेत. या सर्व प्रोडक्टला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभेल. नांदेड विभागातील सर्व विमा प्रतिनिधी आणि विकास अधिकारी यांना नवीन प्रोडक्ट संदर्भामध्ये प्रशिक्षण दिलेले आहे. या आर्थिक वर्षामध्ये उरलेल्या दिवसांमध्ये नांदेड विभाग अशीच कामगिरी करेल.
- जनार्धन लामतुरे, विभागीय अधिकारी, नांदेड विभाग, एलआयसी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com