esakal | लॉकडाऊन’मध्ये राबणारांच्या आरोग्यासाठी मानवतेचे दर्शन- काय आहे ते वाचा  
sakal

बोलून बातमी शोधा

photo

आपल्या सुरक्षीत आरोग्यासाठी जीव मुठीत घेवून रस्त्यावर राबवणाऱ्या पोलिस, सफाई कामगारांनाही आरोग्य आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सुविधा पुरविणारी दुकाने काही वेळा पुरती सुरू आहेत. हॉटेल, खानावळी बंद असल्याने रस्त्यावर बस्तान मांडलेल्या काही नागरीकांना भुक भागवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

लॉकडाऊन’मध्ये राबणारांच्या आरोग्यासाठी मानवतेचे दर्शन- काय आहे ते वाचा  

sakal_logo
By
नवनाथ येवले

नांदेड : जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने आपल्या सुरक्षीत आरोग्यासाठी जीव मुठीत घेवून रस्त्यावर राबवणाऱ्या पोलिस, सफाई कामगारांनाही आरोग्य आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सुविधा पुरविणारी दुकाने काही वेळा पुरती सुरू आहेत. हॉटेल, खानावळी बंद असल्याने रस्त्यावर बस्तान मांडलेल्या काही नागरीकांना भुक भागवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

कोरोनाशी दोन हात करताना निर्मणुष्य रस्त्याच्या कोपऱ्यात भुकेच्या आकांताने लाहीलाही करणाऱ्या नागरीकांना घरातून बाहेर पडताना आणलेला भाकरीचा घास भरवताना जागोजाग वर्धीतल्या मानवतेचे दर्शन घडत आहे. सफाई कामागारांकडूनही भुकेलेल्यांची भुक भागवण्यात येत आहे. आपल्या आरोग्यासाठी रस्त्यावर राबणाऱ्या मानवतेच्या दुतांचे आरोग्य अबादीत राखण्यासाठी नांदेड शहरामध्ये MSMRA युनिट धाऊन आले आहे. 

खबरदारी हाच उपाय 
कारोना विषणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. २४) (ता.१५) एप्रील पर्यंत लॉकडाऊनचे आहवान केले आहे. देशात कोरोना बाधीत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने मंगळवार (ता. ३१) मार्च पर्यंतचे लॉकडाऊन आता (ता.१५) एप्रील पर्यंत कायम ठेवण्यात आले आहे. या भयानक महामारीचं संकट दार ठोठावत असल्याने संकटाच्या वेळी संपुर्ण देशभरातील नागरिकांनी मिळुन सामना केला तरच आपण टिकू. वैद्यकीय चिकीत्सामध्ये आपल्या देशापेक्षाही अग्रेसर इटली सारखा देश या महाभयानक परिस्थिती चा सामना करताना आपले गुडघे टेकवतोय, तर आपण त्यांच्या बरोबरीत कुठेच टिकणार  त्यामुळे सुचनांचे पालन हाच खबरदारीचा उपाय आहे. 

हेही वाचा-  घरीच थांबा... कोरोनाला पळवा- खा. चिखलीकर
 
सर्व नागरिक लॉकडाऊन 
आपणाला टिकवेल ती फक्त आपली एकी आणि आपल्यातला संयम आणि सेवाभाव. याच भरवशावर आपण ही लढाई लढतोय,  कोरोनाशी दोन हात करताना देशाचा कर्तव्य दक्ष नागरिक म्हणून आपण प्रशासनाच्या आदेशाचं काटेकोर पालन करत स्वतः आणि आपला परिवार घरातच राहुन, राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे फायद्याचे ठरत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून सर्व सर्वनागरीक  लॉकडाऊन आहे. 

 एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही 
राष्ट्रीय आपत्तीच्या काळात काही महान विभूती भयंकर संकटाला सामोर जाताना देश सेवा बजावण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. कोरोना व्हायरस च्या संक्रमणापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी कुंटूबाच्या भावनांचा विचार न करता, राष्ट्र प्रथम समजुन तुमच्या-आमच्यासाठी तळपत्या उन्हात, आहोरात्र ताठ माणेने उभे राहून चौका-चौकात स्वत:ची काळजी घ्या, बाहेर फिरू नका म्हणून विनवनी करत, स्वतः माञ मैदानात उतरून कोरोनाशी दोन हात करत आहेत. अशा राष्ट्र भक्तांची काळजी घेनं हे आपलं कर्तव्य आहे.

आपल्यासाठी राबणारे माणवतेचे दुत 
प्रशासकीय पातळीवर तळमळीने जिव ओतुन काम करणारी यंत्रणा. जिल्हा पोलिस प्रशासन, जिल्हा महसुल प्रशासन त्यासोबत महत्वाची भुमिका बजावणारे जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल सेवा पुरविणारे होलसेलर्स-रिटेलर्स, औषधी पुरवठा करणारे कामगार, महानगर पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांपासुन सर्व प्रशासकीय अधिकारी.

आपल्या घरापर्यंत जिल्ह्यासह राज्य आणि देशभरातील सर्व लेटेस्ट अपडेट आपल्या सर्वांना घरी बसुन मिळाव्यात आणि आपण अजुन जास्त सतर्क राहुन स्वतःची आणि आपल्या परिवाराची त्यासोबतच राष्ट्राची काळजी घ्यावी म्हणुन आपनापर्यंत बातम्या पोहचवण्यासाठी खटाटोप करणारे माध्यम प्रतिनिधी कुटुंबाचा विचार न करता जबाबदारीला राष्ट्रीय कर्तव्य समजुन दिवसरात्र राबत आहेत. 

येथे क्लिक करा -  कोरोनाचे सावट : सहकाऱ्याची गुढी उभारा- एसपी विजयकुमार

आदेशानेच पालन करण्याचे आवाहन  
कोरोनाला हरवण्यासाठी आपल्या आरोग्यासाठी रस्त्यावर राबणाऱ्यांसाठी सेवा भाव जपत MSMRA युनिट तर्फे मंगळवारी (ता.२४) २०२० सकाळपासून शहरात कर्तव्यावरील पोलिस उपविभागीय अधिकारी अभिजीत फस्के, वजीराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदिप शिवले यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी, वाहतुक पोलिस कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल कर्मचारी,  महापालिकेतील सफाई कर्मचारी, पत्रकार बांधवांना मास्क (जे की आज सहज उपलब्ध नाहीत) पेपर सोप, हॅंड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन च्या काळात सरकारच्या सुचनांचे पालन करत आपन घरात बसुन कारोना विरुद्धची आपण जिंकणारच आहोत त्यासाठी सरकारच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन MSMRA युनिटतर्फे देण्यात येत आहे.