उत्पादन तयार पण ‘कांदा चाळ’ नसल्याने नुकसानीची भीती, कुठे आणि कशी ते वाचा...  

kanda
kanda
Updated on

घोगरी ः कांदा या पिकास परिसरातील शेतकऱ्यांची अधिक पसंती दिसून येत आहे. परंतु ‘कोरोना’च्या उद्भवलेल्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदीच्याकाळात नेमकी कांदा काढणी प्रक्रिया सुरू झाली. कांदा काढणी मजूराअभावी होत असल्याने बळीराजा चिंतेत आहे, त्यातच शासनाने आखून दिलेल्या सोशल डिस्टन्सचे पालन करून कांदा काढणीच्या प्रक्रिया राबविली जात आहे. कांदा काढणी प्रक्रिया होऊन जवळपास पंधरा दिवसांचा काळ लोटला यातच सर्वच वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याने कांदा ठेवण्यास जागा नसल्याने ‘कांदा चाळ’ जवळपास कुठेही नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

कधी दुष्काळाचे सावट तर कधी परतीच्या पावसाने शेतीचे झालेले नुकसान, शिवाय वातावरणात होत असलेला बदल यामुळे ‘कांदा’ हे पीक येईल की नाही, अशी आजवरची कास्तकाराची धारणा होती. परंतु, नजीकच्या काळात वातावरणात बदल होऊनही, अल्प शेतीमध्येही कांद्याचे भरपूर उत्पन्न होत असल्याने बहुतांश ठिकाणचा बळीराजा या शेतीकडे वळण्याचे दिसून येते. 

वाया जाण्याचा धोका कमी
कांदा या पिकाची एकदा लागवड केल्यानंतर इतर पिकाच्या तुलनेत या पिकाला अल्प खर्च येत असल्याने व केवळ काढणीच्या वेळीच दाराची निकड भासत असल्याने कांदाही फळ शेती किफायतशीर ठरत असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय धनी केल्यानंतर काय करतोय, या मालाला लवकर बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने वाया जाण्याचा धोका कमी आहे. 

बरेचसे लागवड क्षेत्र कांद्याने व्यापले 
या भागातील राजवाडी, पिंपळगाव, ब्रह्मवाडी, घोगरी, येवली, वायपना बुद्रुक, वायफणा खुर्द, शिवपुरी आदी गावचे कास्तकार, कापूस, सोयाबीन, ऊस, हळद, ज्वारी, मुग, उडीद, तिळ ही मुख्य पिके घेताना आढळून येतो. कांदा या पिकाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसत. कांदा हा नाशवंत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असत. शेतीत मुबलक पाणी असूनही केवळ वर्षाकाठी लागेल इतका कांदा, लसन या पिकाचे उत्पन्न घेतले जात असे. कालांतराने अल्पभूधारक शेतकऱ्याचा या शेतीकडे कल वाढला आणि पाहता पाहता या परिसरातील बरेचसे लागवड क्षेत्र हे कांदा या पिकाने व्यापलेले दिसून येते. 



दीड एकर शेतीत कांदा लागवड
गतवर्षी जवळपास १९ गुंठे शेतीत कांदा लागवड केली होती. यातून सत्तेचाळीस हजारांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी दीड एकर शेतीत कांदा लागवड केली आहे. कांदा काढणी प्रक्रिया बरीच पूर्ण झाली असून, कांदा आडत बंद होण्याने मोठे नुकसान होणार आहे. 
-तातेराव चोंडे, सधन शेतकरी, ब्रह्मवाडी. 

 

कांदा शेती फायदेशीर ठरणारी 
इतर पिकांच्या तुलनेत कांदा या शेतीला जास्तीच्या मनुष्यबळाची गरज नसल्याने कांदा शेती फायदेशीर ठरणारी आहे. परंतु, त्यानंतर लगेच बाजारपेठ आवश्यक आहे ‘कोरोना’ संकटामुळे यावर्षी मोठे नुकसान होणार आहे. 
- यंकट खांडरे, कास्तकार, पिंपळगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com