अहमदपूर : विनायकराव पाटलांना पक्षाच्या चिन्हावर विजय नाहीच | Election Results 2019

प्रशांत शेटे
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

2004 च्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली. भाजपकडून बब्रुवान खंदाडे, कॉंग्रेसकडून विनायकराव पाटील व रिडोलसकडून बाबासाहेब पाटील यांनी निवडणूक लढवून बाबासाहेब पाटील यांनी विजय मिळविला.

चाकूर (जि. लातूर) -  अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यादा आमदार होण्याची संधी मिळती नाही, ही परंपरा या निवडणुकीतही कायम राहिली असून, विनायकराव पाटील यांना पक्षाच्या चिन्हावर विजय मिळत नाही हे मतदारांनी सिद्ध करून दाखविले.
    
अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचा आजपर्यंतचा इतिहास पाहता येथून सलग दुसऱ्या वेळेस आमदार होण्याची संधी मतदारांनी कोणालाही दिलेली नाही. 1995 च्या निवडणुकीत भाजपकडून भगवानराव नागरगोजे विजयी झाले होते. यानंतरच्या 1999 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विनायकराव पाटील यांनी त्यांचा पराभव केला व त्यांनी कॉंग्रेसला पाठिंबा देऊन 2004 ची निवडणूक कॉंग्रेसच्या चिन्हावर लढवली. त्यावेळी ते विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. भाजपचे उमेदवार बब्रुवान खंदाडे यांनी त्यांचा पराभव केला.

2004 च्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली. भाजपकडून बब्रुवान खंदाडे, कॉंग्रेसकडून विनायकराव पाटील व रिडोलसकडून बाबासाहेब पाटील यांनी निवडणूक लढवून बाबासाहेब पाटील यांनी विजय मिळविला. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला व 2014 ची निवडणूक लढवली. त्यावेळी अपक्ष निवडणूक लढविलेले विनायकराव पाटील विजयी झाले व त्यांनी
भाजपमध्ये प्रवेश केला. सुरवातीपासून भाजपमध्ये असलेल्या नेत्यांचा विनायकराव पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होता.

यामुळे भाजपातील दिलीपराव देशमुख व अयोध्या केंद्रे यांनी निवडणूक लढवली. या दोन बंडखोराचा फायदा राष्ट्रवादीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांना झाला. भाजपातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार विनायकराव पाटील यांच्या विरूद्ध उघडपणे विरोध करीत दिलीपराव देशमुख व अयोध्या केंद्रे यांचा प्रचार केला, केंद्रात व राज्यात भाजपची सत्ताअसल्यामुळे आपला विजय निश्चीत होईल असे भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. 

 परंतु  मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आमदार विनायकराव पाटील यांच्या विरोधात मतदान केले. सलग दुसऱ्यांदा आमदारकी नाही यासोबतच विनायकराव पाटील यांना पक्षाच्या चिन्हावर विजय मिळवीता येत नाही, हा इतिहास मतदारांनी कायम ठेवला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reason for Vinaykarao Patil's defeat