Beed Loksabha Voting : बीडमध्ये झाले विक्रमी मतदान ; जालन्यातही टक्केवारी वाढली, सायंकाळी सातनंतरही रांगा

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मराठवाड्यातील औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड आणि जालना या तीन मतदारसंघांत सोमवारी (ता. १३) मतदान झाले.
Beed Loksabha Voting
Beed Loksabha Voting sakal

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मराठवाड्यातील औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड आणि जालना या तीन मतदारसंघांत सोमवारी (ता. १३) मतदान झाले. औरंगाबाद मतदारसंघात सायंकाळी सातपर्यंत ६०.७३ टक्के, जालन्यात ६५.६६ तर बीडमध्ये ६८ टक्के मतदान झाले. सातनंतरही अनेक केंद्रांत मतदार रांगेत होते. त्यामुळे यात आणखी वाढ होणार असून, यावेळी जालना आणि बीड मतदार संघाची टक्केवारी ७० च्या आसपास जाणार आहे. मागील काही निवडणुकीतील हा सर्वोच्च आकडा आहे.

यावेळी महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होत आहे. मराठवाड्यात आठ मतदारसंघ आहेत. त्यापैकी दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला नांदेड, हिंगोली आणि परभणी, तर तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी लातूर आणि उस्मानाबाद या पाच मतदारसंघांत मतदान झाले. उर्वरित तीन मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान झाले. त्यामुळे आता मराठवाड्यातील सर्वच मतदारसंघांतील मतदान संपले आहे. चौथ्या टप्प्यातील तीनही मतदारसंघांत मतदानाचा टक्का वाढणार आहे.

कसे वाढले मतदान?

मराठवाड्यात यापूर्वी पाच मतदारसंघांत २६ एप्रिल आणि ७ मे रोजी मतदान झाले होते. त्या दोन्ही दिवशी तापमान ४० अंशांच्या पुढे होते. परिणामी, अनेक मतदार कडक उन्हामुळे घराबाहेर पडले नाहीत. दरम्यान, सोमवारी (ता. १३) दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तापमान ३५-३८ अंशांच्या आसपास असल्याने केंद्रांवर दुपारीही रांगा पाहायला मिळाल्या. याशिवाय प्रशासन, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही मतदान करण्याविषयी जनजागृती केली होती.

रिंगणातील उमेदवार

औरंगाबाद ३७, जालना २६ आणि बीड ४१

प्रमुख लढती अशा

जालना : रावसाहेब दानवे (भाजप), डॉ. कल्याण काळे (काँग्रेस)

औरंगाबाद : इम्तियाज जलील (एमआयएम), संदीपान भुमरे (शिवसेना), चंद्रकांत खैरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

बीड : पंकजा मुंडे (भाजप), बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)

दृष्टिक्षेपात

छत्रपती संभाजीनगर

  • छत्रपती संभाजीनगर शहरात बोगस मतदानाचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद.

  • सायंकाळी सातनंतरही १८ मतदान केंद्रांत अनेक जण रांगेत होते.

  • मतदानासाठी राखीव कर्मचारी मानधनापासून वंचित, विधानसभा निवडणुकीवर टाकणार बहिष्कार.

  • छत्रपती संभाजीनगरच्या कन्या शाळा केंद्रावर पाऊण तास मशीन बंद, मतदार ताटकळले.

  • नियोजित वेळेच्या अगोदरपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा.

  • छत्रपती संभाजीनगरातील नारेगावात ईव्हीएम बंद पडल्याने काही काळ मतदानाचा खोळंबा.

बीड

  • मतदानाच्या सुरवातीलाच २६ बूथवरील मतदान यंत्र बदलण्यात आले.

  • काटवटवाडी (ता. बीड) उर्दू माध्यमिक विद्यालय, बीड या केंद्रासह इतर आठ मतदान केंद्रांतील कंट्रोल युनिटमध्ये तांत्रिक अडचणींमुळे ते बदलण्यात आले.

  • १८ ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आले.

  • जिल्ह्यात ५५ केंद्रे महिलांनी चालविली, तर १५ आदर्श केंद्रे सजावट करून उभारण्यात आली.

  • सकाळी सातपासून मतदानाला सुरवात होऊन एकपर्यंत गतीने मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात साडेतीनपासून उशिरापर्यंत मतदान झाले.

  • बीड व परळी मतदारसंघांतील काही केंद्रांवर रात्री साडेआठपर्यंत मतदान झाले.

जालना

  • सायंकाळी साडेसातनंतर ६६ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू होती.

  • मतदान सुरू होण्यापूर्वी २१ बीयू, १९ सीयू आणि २८ व्हीव्हीपॅट मशीन बदल्या

  • मतदार संघात मतदान सुरू झाल्यानंतर २२ बीयू, ११ सीयू आणि २१ व्हीव्हीपॅट मशीन बदल्या

  • शहरातील डब्बल जीन येथील मतदान मशिनच्या रचनेत बदल केल्याचा आमदार कैलास गोरंट्याल यांचा आरोप, काही काळ मतदान थांबवले.

  • त्यानंतर मतदान मशिनची रचना सरळ केल्याचा जिल्हाधिकारी डॉ. कृष्ण पांचाळ यांचा निर्वाळा.

  • जालना तालुक्यातील दरेगाव येथे परराज्यातील कामगारांचे मतदार यादीत नाव. ग्रामस्थांकडून आक्षेप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com