Record Rain in Parli: रेकॉर्ड तुटले, पिकांत झाले पाणी; परळी तालुक्यात नागरिकांचे हाल, अनेक ठिकाणचे रस्ते बंद
Flood Alert: परळी तालुक्यात सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे अनेक रस्ते वाहतुकीस बंद झाले आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
परळी वैजनाथ : तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आभाळ फाटल्यासारखी स्थिती आहे. सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.