बीड - मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात निकाल येण्यासाठी वर्ष उजडणार नाही, असे वाटले होते. वर्षाच्या आत आरोपींना फासावर लटकवू, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता..मात्र, या प्रकरणात दिरंगाई होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक आमदार या प्रकरणात यंत्रणा चालवत असल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केला. या प्रकरणातील आरोपी सुटले तर बीड जिल्ह्यासह राज्य बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला..सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर २०२४ ला अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला मंगळवारी (ता. नऊ) वर्ष झाले. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी देशमुख यांची आई, पत्नीने हंबरडा फोडला. जरांगे म्हणाले, ‘संतोष देशमुख प्रकरणात आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत..आरोपी फासावर गेल्याशिवाय आमचे समाधान होणार नाही. परळीवाल्यांनी काही माणसे पेरून ठेवली आहेत. आपला एक माणूस सुटणार, असे ते बेालत आहेत. परळीवाले असे का बोलतात, हे सरकारने शोधावे. आरोपींना फाशी होईपर्यंत मागे हटणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दामुळे या प्रकरणाचा तपास योग्य वाटत होता. त्यांच्या शब्दामुळेच सगळे शांत बसले होते.आता सरकारने या प्रकरणात दबाव आणला जात आहे का ते बघितले पाहिजे. हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे अद्याप का सापडत नाही, याचाही विचार व्हायला हवा. सरकारने हा विषय चार-पाच महिन्यांच्या आत संपवावा. त्यानंतर कुटुंबांनी हाक दिल्यास आम्ही कशाचाही विचार करणार नाही.’.न्याय मिळायला हवा होता - धनंजय देशमुखगावातील परिस्थिती भयाण आहे. आम्ही लढा देत आहोत. आतापर्यंत न्याय मिळायला हवा होता, मात्र अद्याप फारशा हालचाली नाहीत, असे धनंजय देशमुख म्हणाले. या प्रकरणात धारूर व केजच्या तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली..गावातून कॅंडल मार्चदरम्यान, गावकऱ्यांनी एकत्र येत रात्री मस्साजोग येथे कॅंडल मार्च काढला. न्याय द्या, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी, अशी मागणी करत हातात मेणबत्त्या घेऊन गावकरी रस्त्यावर उतरले. केजचे तहसीलदार राकेश गिड्डे, पोलिस निरीक्षक अमोल उनवणे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने गावात भेट दिली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.