Adul News : सत्तेसाठी जाती जातीत भांडणे लावणारयांना धडा शिकवा; डॉ. कल्याण काळे

हि लढाई मोदी विरुध्द राहुल गांधी नसुन जनता विरुध्द मोदी आहे. हुकुमशाहाला त्याची जागा दाखविण्याची हिच योग्य वेळ आहे.
religious caste dispute for political power dr kalyan kale lok sabha politics
religious caste dispute for political power dr kalyan kale lok sabha politicsSakal

आडुळ : सत्तेसाठी देशातील विविध जाती धर्मात भांडणे लावणारयांना धडा शिकवा असे प्रतिपादन जालना लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी जालना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आडुळ व पाचोड जिल्हा परिषद गटाच्या आडुळ येथे शनिवारी ता. ४ रोजी आयोजीत प्रचार सभेत बोलतांना केले.

यावेळी ते पुढे म्हणाले कि, हि लढाई मोदी विरुध्द राहुल गांधी नसुन जनता विरुध्द मोदी आहे. हुकुमशाहाला त्याची जागा दाखविण्याची हिच योग्य वेळ आहे. असे त्यांनी यावेळी सांगीतले. यावेळी व्यासपिठावर माजी आमदार संजय वाघचौरे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, विनोद तांबे, ॲड बद्रीनारायण भुमरे, रविंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ कल्याण काळे यांना प्रचंड मताधिक्याने निवडुन द्यावे असे आवाहन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पैठण विधानसभा मतदारसंघाचे नेते जिल्हा उपप्रमुख दत्ता गोर्डे यांनी केले. माजी आमदार संजय वाघचौरे यांनी सांगीतले कि. श्री. काळे निवडुन येताच पहिले काम आडुळ भागातील पाणी टंचाई संदर्भात करण्यात येईल.

तर ॲड बद्रीनारायण भुमरे व विनोद तांबे यांनी मतदार संघाच्या विकासासाठी डॉ. काळे यांनाच आपले अमुल्य मत द्यावे असे अवाहन उपस्थितांना केले. यावेळी याप्रसंगी लोकसभेचे उमेदवार डॉ कल्याण काळे,

माजी आमदार संजय वाघचौरे, रविंद्र काळे, ॲड बद्रीनारायण भुमरे, विनोद तांबे, शुभम पिवळ, भाऊसाहेब पिवळ, बबन भावले, सुनिल पिवळ, कांचनकुमार चाटे, रामुनाना पिवळ, डॉ. नंदु वाघ, मनोहर इंगळे, रुस्तुम वाघ, जब्बार शेख,

अनिस पटेल यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तत्पुर्वी आज बिडकीन, ढोरकीन, चितेगाव, दावरवाडी, विहामंडवा येथे जिल्हा परिषद सर्कल निहाय सभा झाली. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com