परभणी जिल्ह्यातील सेलूच्या पशुचिकित्सालयाची दूरावस्था

file photo
file photo

सेलू ( जिल्हा परभणी ) : आजारी पशुधनांना वेळेत उपचार मिळावेत या हेतूने राज्य शासनाने राज्यभरात पशु सर्व चिकित्सालये उघडली. काही काळ ती चिकित्सालये उत्तम पध्दतीने चालली. परंतु अलिकडच्या वाढत्या यांत्रिकरणाच्या काळात या चिकित्सालयाचा खेळखंडोबा झाला असून पशुधनांना वेळेत उपचार मिळणे दूरापास्त झाले आहे. येथिल पशु चिकित्सालय केवळ दोनच कर्मचार्‍यांवर चालत असून कार्यालय परिसरासह कर्मचार्‍यांच्या निवासस्थानाचीही दूरावस्था झाली आहे.

इ. स. २००४ साली राज्य शासनाच्यावतिने शहरातील विद्यानगर परिसरात तालूका लघु पशु चिकित्सालय सुरू करण्यात आले. यासाठी लाखो रूपये खर्च करून अद्यावत साधन सामुग्रीसह कर्मचर्‍यांची निवासस्थानेही उभारण्यात आली. काही काळ या चिकित्सालयात आजारी पशुधनाचे वेळेत उपचार होत होते. कालांतराने वाढत्या यांत्रिकिकरणाने पशुधनाची संख्या कमी होत गेली. तसे या चिकित्सालयाच्या सेवेतही फरक पडत गेला. सद्य:स्थितीत या चिकित्सालयात पशुधन विकास अधिकारी व परिचर हे दोनच कर्मचारी कार्यरत आहेत.

या चिकित्सालयाअंतर्गत तालुक्यातील मोरेगाव, बोरकिणी व चिकलठाणा ( बुद्रुक ) या तिन ठिकाणी उपकेंद्र चालतात. या उपकेंद्रातही मोरेगाव सोडले तर बोरकिणी व चिकलठाणा ( बुद्रुक ) या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक हे पद रिक्त असून प्रत्येकी एकच परिचर कार्यरत आहे. सेलू येथिल चिकित्सालयात पाच पदे मंजूर असतांनाही रिक्त पदे भरली नाहीत. तर तालुक्यातील दोन उपकेंद्रातील रिक्त पदांमूळे आजारी पशुधनाची हेळसांड होत आहे.दिवसभरात चाळीस ते पन्नास आजारी पशुधन उपचारासाठी आणले जातात. परंतु अपुर्‍या कर्मचार्‍यांमूळे पशुधनांना उपचाराअभावी परत नेण्याची वेळ पशु मालकांवर येत आहे.

राज्यात 'कोरोना' रोगाने थैमान घातले. त्याच बरोबर 'बर्ड फ्लु' हा रोग राज्यासह जिल्ह्यात परसला असून कुपटा ( ता. सेलू ) येथिल मृत कोंबड्यांचा अहवालही बर्ड फ्लुमुळेच मृत्यू झाल्याचा आला आहे. त्यामुळे पशुधन जोपासणार्‍या नागरिकांना अशा वेगवेगळ्या येत असलेल्या रोगांची भिती वाटत आहे. पशु चिकित्सालयातील उर्वरित पदे तात्काळ भरावित अशी मागणी पशुधन मालकांकडून होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com