
तालुक्यातील प्रस्थापितांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे. बारसगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे यांनी विजयाची हॅट्रीक केली आहे.
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल धक्कादायक लागण्याची परंपरा यंदाच्या निवडणूकीत कायम राहिली आहे. तालुक्यातील प्रस्थापितांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे. बारसगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे यांनी विजयाची हॅट्रीक केली आहे. पार्डी येथे माजी सरपंच निळकंठ मदने, मारोतराव देशमुख, देळूब बुद्रूक आझर पठान, पाटणूरमध्ये शिवाजी शिंदे, बामणी मध्ये मारोती स्वामी, निमगावमध्ये संजय मोळके यांच्या पॅनलला बहुमत मिळाले आहे. लहानमध्ये धक्कादायक निकाल लागला असून संजय देशमुख यांच्या पॅनलला सहा तर सदाशिव इंगळे यांच्या गटाला सात जागा मिळाल्या आहेत.
तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सोमवारी (ता. 18) तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी दहा वाजता सुरु झाली. या मतमोजणी बद्दल नागरिकात प्रचक उत्सुक निर्माण झाली होती. पहिल्या फेरीत बारा ग्रामपंचायतची मतमोजणी झाली.
हेही वाचा - Gram Panchayat Result : हिंगोली तालुक्यातील मतमोजणी सुरु, शहरात कडक बंदोबस्त
तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये लहान ग्रामपंचायतीचा समावेश होतो. येथे तिरंगी लढत झाली. यात सदाशिव इंगळे गटाची सरशी झाली आहे. त्यांच्या गटाला 13 पैकी सात जगा मिळाल्या तर काॅग्रेसचे संजय देशमुख लहानकर यांच्या गटाला सहा जगा मिळाल्या आहेत.
बारसगाव येथे जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे यांनी विजयाची हॅट्रीक केली आहे. त्यांच्या पॅनलच्या नऊपैकी नऊ जागा मिळाल्या आहेत. तर पार्डी ग्रामपंचायतीमध्ये निळकंठ मदने व मारोतराव देशमुख यांच्या गटाला 11 पैकी दहा जागा मिळाल्या आहेत. देळूब बुद्रूक येथे सत्ता परिवर्तन झाले असून आझर पठान यांच्या पॅनलला नऊ जागा मिळाल्या.
पांगरी येथे दत्ता पाटील गटाचे दोन तर नामदेव दुधाटे यांच्या तीन जागा निवडून आल्या आहेत. तर दोन जागा बिनविरोध निवडुण आल्या आहेत. निमगाव येथील आकरा जागापैकी संजय मोळके यांच्या गटाला सात जागा तर घोरपडे यांच्या गटाला चार जगा मिळाल्या आहेत. पाटणूर ग्रामपंचायत निवडणूकीत शिवाजी शिंदे यांच्या पॅनलला बहुमत मिळाले आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे