तब्बल 9 हजार रोपांनी साकारले शिवराय!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 February 2020

वाशीत या मित्रमंडळातर्फे तब्बल ९ हजार रोपांचा वापर करून शिवप्रतिमा साकारण्यात आली आहे. शिवरायांच्या चेहऱ्याच्या आकाराची ही प्रतिकृती सुंदर दिसत आहे. १६ फेब्रुवारीपासून नागरिकांसाठी ही प्रतिमा पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. शिवजयंती व वृक्षसंवर्धन बांधिलकीच्या उद्देशाने ही संकल्पना आमलात आणण्यात आली आहे.  

वाशी : दरवर्षी प्रमाणे शिवाजी महाराजांच्या जयंतीची तयारी जोरदार सुरू आहे. शिवरायांवरील प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असली तरी प्रत्येकजण काहीतरी हटके करण्याच्या प्रयत्नात असते. अशाच प्रकारे वाशी येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव नवनिर्माण मित्रमंडळाच्या वतीने हटके पद्धतीत शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाशीत या मित्रमंडळातर्फे तब्बल ९ हजार रोपांचा वापर करून शिवप्रतिमा साकारण्यात आली आहे. शिवरायांच्या चेहऱ्याच्या आकाराची ही प्रतिकृती सुंदर दिसत आहे. १६ फेब्रुवारीपासून नागरिकांसाठी ही प्रतिमा पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. शिवजयंती व वृक्षसंवर्धन बांधिलकीच्या उद्देशाने ही संकल्पना आमलात आणण्यात आली आहे.  

शिवाजी महाराजांची ही प्रतिमा कळंब तालुक्यातील शिराढोण येथील राजकुमार कुंभार या कलाकाराने साकारली आहे. शिवजयंती झाल्यानंतर ही रोपे शिवप्रेमींमध्ये वाटण्यात येणार आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: replica of Shivaji Maharaj from plants