COVID-19 : लातुरात दिवसभरात तब्बल 21 पॉझिटिव्ह

सुशांत सांगवे
बुधवार, 1 जुलै 2020

लातूर जिल्ह्यात सध्या 140 रुग्णांवर उपचार सुरु असून 201 रुग्ण आजवर बरे झाले आहेत. तर उपचारदम्यान 17 जणांचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

लातूर : लातूर शहरात दिवसभरात तब्बल 18 कोरोना पॉझिटिव्ह, चाकूर तालुक्यात 2 तर उदगीर तालुक्यात 1 असे एकाच दिवशी तब्बल 21 कोरोनाबाधित रुग्ण मंगळवारी (ता. 30) आढळून आले. ही वाढती रुग्णसंख्या लातूरकरांसाठी काळजीचा विषय ठरली आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यात सध्या 140 रुग्णांवर उपचार सुरु असून 201 रुग्ण आजवर बरे झाले आहेत. तर उपचारदम्यान 17 जणांचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिवसभरात 189 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आज आले होते. त्यातील 155 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 12 जणांचे अहवाल अंतिम आले नाहीत. 189 पैकी संस्थेत एकूण 54 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 40 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 9 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 5 व्यक्तींचे अहवाल अंतिम आले नाहीत. पालिकेकडून 31 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते. त्यातील 10 पॉझिटिव्ह आले आहेत तर 5 अंतिम आले नाहीत. 

 शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : अखेर ‘त्या’ सोयाबीन उत्पादक कंपनीवर नांदेडात गुन्हा दाखल 

पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती खंडोबा गल्ली (3), मजगे नगर (7), काळे गल्ली (1), गौसपूरा (1), महादेव नगर (1), इंडिया नगर (1), सुभेदार रामजी नगर (1), भीम नगर (1) येथील व्यक्तींचा समावेश आहे. याशिवाय, 1व्यक्ती एकोंडी रस्ता (उस्मानाबाद) आणि एक व्यक्ती नांदेड येथील आहे. तर एका व्यक्तीची पुनर्तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. उर्वरित 3 पैकी 2 व्यक्ती चाकूर येथील तर एक व्यक्ती उदगीर येथील आहे.

कोरोनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती उच्च न्यायालयात जाणार 
 
चाकूर शहरात पहिला कोरोना रुग्ण
चाकूर : चाकूर शहरात मंगळवारी (ता. ३०) पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यासोबतच रोहिणा (ता. चाकूर) येथील एकास कोरोनाची लागण झाली असून आजपर्यंत तालूक्यात 4 रुग्ण झाले आहेत. ग्रामीण रुग्णालयातून सहा व्यक्तींचे स्वॅब लातूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. रात्री उशिरा आलेल्या अहवालात दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात एक आरोग्य कर्मचारी असून दुसरा रोहीणा येथील व्यक्ती आहे. ही व्यक्ती एका विवाह समारंभाला उपस्थित राहिल्याची माहीती आहे.
 
लातूर : कोरोना मीटर

  • एकूण बाधित : 358
  • बरे झालेले : 201
  • उपचार सुरु : 140
  • मृत्यू : 17

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reports 21 new COVID-19 cases in Latur dist