esakal | बीडमध्ये कोरोनाचा कहर; डॉक्टरसह, बँकेचे पाच अधिकारी बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

Reports 5 new COVID-19 cases in Beed District

शुक्रवारी तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. यात शहरातील एका प्रतिथयश रुग्णालयातील डॉक्टरला बाधा झाल्याचे समोर आले होते.

बीडमध्ये कोरोनाचा कहर; डॉक्टरसह, बँकेचे पाच अधिकारी बाधित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : मधल्या काळात थंडावलेला कोरोनाचा कहर जिल्ह्यात पुन्हा सुरू झाला. शुक्रवारी (ता. तीन) बीडमधील एका खासगी डॉक्टरला बाधा झाल्यानंतर शनिवारी (ता. चार) पुन्हा परळीतील पाच बँक अधिकाऱ्यांना बाधा झाल्याचे समोर आले. शनिवारी जिल्ह्यात नऊ आणि बाहेर गेलेल्या दोघांना बाधा आढळली.

शुक्रवारी तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. यात शहरातील एका प्रतिथयश रुग्णालयातील डॉक्टरला बाधा झाल्याचे समोर आले होते. शनिवारी सर्वाधिक २५१ थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविले. यात नऊ स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर २४२ अहवाल निगेटीव्ह आले. यामध्ये सर्वाधिक पाच परळी शहरातील पुरुष आहेत. तर, राळेसांगवी (ता. शिरुर) येथील भिवंडीहून आलेल्या एका पुरुषासह बागझरी (ता. अंबाजोगाई) येथे पुण्याहून आलेल्या महिलेला कोरोनाची बाधा असल्याचे समोर आले.

भारत विरुद्ध चीन: कागदावर ड्रॅगनची शक्ती मोठी, पण...

बीड शहरातील अजीजपुरा व डीपी रोड या ठिकाणी प्रत्येकी एका महिलांना कोरोनाची बाधा असल्याचे समोर आले. दरम्यान, बीडमधील बालेपीरमधील औरंगाबादला गेलेल्या एकाला व कारखेल (ता. आष्टी) येथून नगरला गेलेल्या एकाला कोरोनाची बाधा असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा दिडशेच्या घरात गेला आहे. आतापर्यंत ११५ कोरोनाग्रस्त उपचारानंतर बरे झाले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे.  
 
परळीत पाच बँक अधिकारी बाधित 
दरम्यान, यापूर्वी परळीच्या एका महिलेचा औरंगाबादेत उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून शनिवारी पुन्हा पाच जण कोरोनाग्रस्त आढळल्याने भिती वाढली आहे. विशेष म्हणजे हे पाच लोक एका बँकेतील अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यामुळे भितीत अधिकच भर पडली आहे.

चीनचं युद्ध : जर-तरच्या गोष्टी (श्रीराम पवार)