esakal | हिंगोली तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण झाले जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

येथील कल्याण मंडपात उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार पांडुरंग माचेवाड आदीच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली

हिंगोली तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण झाले जाहीर

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : तालुक्यातील १११ ग्रामपंचायत सरपंच पदाचे  आरक्षण शनिवारी ( ता. ३० )  काढण्यात आले. यामध्ये अनुसूचित जातीसाठी १८, अनुसूचित जमाती आठ, ओबीसी ३० तर सर्वसाधारण ५५ जागेसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यात ५६ महिला सरपंच होणार आहेत.

येथील कल्याण मंडपात उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार पांडुरंग माचेवाड आदीच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.

त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी हानवतखेडा, कडती, गिलोरी, खानापूर चिता, जोडतळा, इडोळी, ब्रम्हपुरी, कोथळज समगा, अनुसूचित जाती महिला अ़भेरी, खडकत, माळधामणी, कनका, भांडेगाव, काळकोंडी, खांबाळा, उमरा, वैजापूर, अनुसूचित जमाती  बोराळवाडी, पेडगाव, डिग्रसवाणी, देवठाणा, अनुसूचित जमाती महिला अंधारवाडी, फाळेगाव, राजुरा, लोहरा, ओबीसी पिंपळखुटा, बळसोंड, बोराळा, मालवाडी, राहोली, लिंबाळा, लि़बी, लोहगाव, संतुक पिंपरी, सरकळी, सिरसम, इ़चा, दुर्गधामणी, जांभरूनतांडा, ओबीसी महिला कनेरगाव नाका, कलगाव, चोरजवळा, टाकळी, पिंपळदरी, भटसावंगी, माळसेलु, लिंबाळा, सावरगाव, आमला, देऊळगाव रामा, उमरखोजा, हिवराबेल.

सर्वसाधारण आंबाळा, केसापुर, खेड, खेर्डा, गाडीबोरी, जयपुरवाडी, जांभरुन आंध, नरसी नामदेव, पहेणी, पांगरी, पातोंडा, बासंबा, भिंगी, भिरडा, माळहिवरा, राहोली खुर्द, वरुडगवळी, साटंबा, सावा, हिंगणी, कळमकोंडा बुद्रुक, आडगाव, जामठी खुर्द, दाटेगाव, सवड, पारडा, लासीना, सर्वसाधारण महिला इसापुर, कानडखेडा बुद्रुक, कानडखेडा खुर्द, करंजाळा, खरबी, डिग्रस कर्हाळे, चिंचोली, नवलगव्हान, नांदुरा, पळसोना, पिंपरखेड, पारोळा, बोडखी, बोरजा, बोरी शिकारी, बोंडाळा, वडद, वराडी, वाझोळा, सावरखेडा, हिरडी, येळी, दुर्गसावंगी, बेलुरा, भोगाव, भटसावंगी, चिंचाळा या गावचा समावेश आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

 

 

loading image