वीस वर्षांपासून साचलेल्या कचऱ्यापासून औसेकर होणार मुक्त

Garbage Problem Ausa
Garbage Problem Ausa

औसा (जि.लातूर) ः औसा शहराच्या कानाकोपऱ्यातून गेल्या वीस वर्षांपासून कचरा गोळा करुन तो नागरसोगा रस्त्यावरील डंपिंग ग्राऊन्डवर साचवला जायचा, या कचऱ्याचा आजुबाजूच्या शेतकऱ्यांना व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास होत होता. शासनाच्या बायोमायनिंग या कार्यक्रमांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये यंत्राद्वारे या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. नुसती विल्हेवाटच नव्हे तर यंत्राद्वारे कुजलेले बारीक खत एकीकडे तर दुसरीकडे अर्धवट कुजलेला कचरा तर तिसरीकडे प्लास्टिक व कापड, काच, धातू निघत आहे.

शासनाने या अभियांनात आठ हजार क्‍युबिक मीटर कचऱ्याच्या ढिगाची विल्हेवाट लावण्यास मंजुरी दिली असुन वीस वर्षांपासून साचलेलेल्या या कचऱ्यापासुन औसेकरांना मुक्ती मिळणार आहे. दोन वर्षांपूर्वी शहरात चार वाहनांद्वारे कचरा संकलित करुन तो डंपिंग ग्राऊंडवर साचविला जायचा. मात्र या साचविलेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्न होता. तशी सोयच नसल्याने गेल्या वीस वर्षांपासून औसा शहरातील संकलित कचरा येथील कचरा मैदानावर पडून राहिल्याने त्याचा मोठा त्रास अजुबाजुच्या लोकांना व पादचाऱ्यांना व्हायचा.

मात्र शासनाने ज्या शहरात कचरा साचला आहे त्या शहरासाठी कचऱ्याला अस्वाव्यस्त न टाकता तो आटोक्‍यात यावा यासाठी यंत्र दिल्या गेल्या. खरे तर या यंत्र खाणीत उपयोगाला येतात, मात्र त्याचा प्रयोग आता कचरा व्यवस्थापनासाठी केला जात आहे. गेल्या दोन वर्षापासुन स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु झाले आणि शहराला दहा प्रभागात दहा घंटा गाड्या मिळाल्या. त्याच बरोबर दोन ट्रॅक्‍टर एक टिप्परद्वारे कचरा गोळा केला जातो व त्या कचऱ्याचे वर्गीकरण करुन तो डंपिंग ग्राऊन्डवर नेला जातो. सध्या शहरात साठपेक्षा जास्त कामगार स्वच्छता मोहीम राबवित आहेत. दररोज सात ते आठ टन कचरा संकलित केला जात आहे. त्यात पाच टन ओला व तीन टन सुका कचरा असतो.

रात्रीही व्यावसायिक ठिकाणाची व मुख्य मार्गाची सफाई केली जात आहे. पालिकेकडून सध्या ओला कचरा हा कंपोस्ट प्रक्रियेद्वारे कुजविला जात आहे. त्यासाठी वेगवेगळे हौद बांधण्यात आले आहेत. तर सुका कचरा ज्यात प्लास्टिक, बाटल्या, कपडा, रबरी वस्तु, कातड्याच्या वस्तु, काचेच्या बाटल्या, विविध धातुच्या वायर, धातु वेगवेगळे करुन प्लास्टिक व रबरी व कातड्याच्या वस्तु एका ठिकाणी साठविता याव्यात म्हणुन त्याचा बारीक भुगा गेला जातो व तो पोत्यात भरुन ठेवला जातो. त्यामुळे वीस वर्षांपासून अस्ताव्यस्त आणि दुर्गंधीयुक्त कचरा आता वेगवेगळा करुन त्याचे खत व अन्य वस्तुंचीही विल्हेवाट लावली जात असल्याने औशाचे डंपिंग ग्राऊंड आता स्वच्छ दिसु लागले आहे.

 

मोठ्या शहरात कचऱ्याच्या विल्हेवाटाची समस्या खुप मोठी आहे. औसा पालिकेने गोळा केलेला विस वर्षापासुनचा कचरा हा यंत्राद्वारे वेगळा केला जात आहे. यामध्ये पूर्ण कुजलेले व शेतात वापरण्या जोगे खत वेगळे, अर्धवट कुजलेले व ओबडधोबड कचरा वेगळा आणि प्लॅस्टीक काच व धातु वेगळे होत असल्याने याची विल्हेवाट लावणे सोपे झाले आहे. घाणीने आणि दुर्गंधीने माखलेल्या हा कचरा डेपो आता स्वच्छतेचा श्वास घेत आहे. पुढील काही दिवसांत अन्य उपाय करुन कचऱ्याचे संपूर्ण निर्मुलन केले जाणार आहे.
- तानाजी चव्हाण, मुख्याधिकारी, औसा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com