water shortage in pachod
sakal
पाचोड - पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा काळ आटोपता झाला तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने व प्रशासनाच्या वतीने सुरू असलेले ३५ गावांचे ४९ टँकर मुदत संपल्याने भर पावसाळ्यात नागरिकांवर पिण्याच्या पाण्याचा शोध घेण्याची नामुष्की ओढवली असून सर्व जलसाठे कोरडीठाक असल्याचे चित्र पाचोड (ता.पैठण) सह चौफेर पाहवयास मिळत असून तालुका प्रशासनाच्या वतीने टँकर पूर्ववत सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.