औरंगाबादला कोरोनाने वेढले आज २४ पॉझिटिव्ह, @६५१

CoronaVirus
CoronaVirus

औरंगाबाद : शहरातील जवळपास सर्वच भागात कोरोनाचा विळखा हळूहळू घट्ट होत आहे. आज मंगळवारी (ता. १२) सकाळी तब्बल २४ रुग्णांचा अहवाल  पॉझिटिव्ह आला असून आता औरंगाबादची रुग्णसंख्या ६५१ इतकी झाली आहे. केवळ १६ दिवसात ५९८ रुग्ण वाढले असून आधीच्या ४२ दिवसात  ५३ रुग्ण होते. हे विशेष ! आज कोरोना बाधित अहवाल आलेल्यात नऊ महिला १६ पुरुषांचा समावेश आहे.

कोरोना बाधितांमध्ये पुंडलिकनगर येथी २, सिडको एन ८ मधील १, रामनगर १ , संजयनगर ५,  प्रकाशनगर १, सिडको एन ७ येथील ४, रोशनगेट, गांधीनगर १,  दत्तनगर १, भडकलगेट १, चिकलठाणा १,  शहानुरमियाँ दर्गा येथील १, अन्य दोन ठिकाणचे रुग्ण तसेच महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याला बाधा झाली आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

ही माहिती शासकीय वैदयकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील एकूण बाधितांच्या आकडा ६५१ पर्यंत पोचला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दौलताबाद, खुलताबाद व  गंगापूर तालुक्यात रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनाचा ग्रामीण भागातही शिरकाव झाला आहे.

कोरोना मीटर

उपचार घेत असलेले रुग्ण : ५२३
बरे झालेले रुग्ण : ११३
मृत्यू झालेले रुग्ण : १५
एकूण : ६५१

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आतापर्यंत झालेले १३ मृत्यू..

५ एप्रिल सातारा परिसरातील ५८ वर्षीय बँक व्यवस्थापकाचा मृत्यू
१४ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू
१८ एप्रिलला बिस्मिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू
२१ एप्रिलला भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू
२२ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू.
२७ एप्रिलला किलेअर्क येथील ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू
२८ एप्रिलला किलेअर्क येथील ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू
१ मे गुरुदत्तनगर, गारखेडा येथील ४७ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू.
२ मे नूर कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू
३ मे देवळाई येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
५ मे भडकल गेट येथील पुरुषाचा मृत्यू.
 मे आसेफिया कॉलनीतील ९५ वर्षीय महिलेचा मृत्यू.
१० मे रोशनगेट येथील ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू
११मे रामनगर, मुकुंदवाडी येथील ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू.
११ मे एका ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com