esakal | रोगाची लागण झाल्याने  घोड्याचा दया मरणाचा प्रस्ताव
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ग्लँडर या जीवणूजन्य गंभीर संसर्गजन्य आजाराचे प्रस्थ मराठवाड्यात वाढत असून नुकतेच औरंगाबाद येथील दोन घोड्याना या आजाराची लागण झाल्याने दया मरण देण्यात आले होते.

रोगाची लागण झाल्याने  घोड्याचा दया मरणाचा प्रस्ताव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोनपेठ (जि.परभणी) : सोनपेठ तालुक्यातील वंदन येथील एका घोड्यास ग्लँडर या संसर्गजन्य गंभीर आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या दया मरणाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. 
ग्लँडर या जीवणूजन्य गंभीर संसर्गजन्य आजाराचे प्रस्थ मराठवाड्यात वाढत असून नुकतेच औरंगाबाद येथील दोन घोड्याना या आजाराची लागण झाल्याने दया मरण देण्यात आले होते.  ग्लँडर हा जीवणूजन्य संसर्गजन्य रोग असून या आजारात अंगाला खाज येणे, पुरळ येणे असे लक्षणे दिसून येतात. हा संसर्गजन्य रोग असल्याने या रोगाची लागण झालेल्या घोड्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला हा रोग होऊ शकतो. सोनपेठ तालुक्यातील वंदन येथील सुभाष रामकिशन सुरवसे यांच्या पाळीव घोड्यास हा रोग झाल्याची माहीती सहायक पशुधन अधिकारी सुनील पोटभरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

औरंगाबादचे पथक गुरुवारी वंदनमध्ये  
या घोड्याला रोगाची लागण झाल्याचा संशय येताच त्याला परभणी येथील उपचारासाठी दाखल करून त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्या चाचणीत या घोड्यास ग्लॅडर्स या गंभीर आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आता या घोड्याला दया मरण द्यावे लागणार असल्यामुळे तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी (ता.५)औरंगाबाद येथील वरिष्ठ कार्यालयाचे एक पथक वंदन येथे येणार असल्याची माहिती सहायक पशुधन अधिकारी सुनील पोटभरे यांनी दिली आहे. 

हेही वाचा ....

हेही वाचा  - ...अन् असा केला मित्राचा विश्वासघात

वाळू चोरीप्रकरणी एक लाखाचा दंड
पूर्णा (जि.परभणी) : देवठाणा (ता. पूर्णा) शिवारातील गोदावरी नदीपात्राजवळ अवैधरीत्या वाळूची चोरी करणाऱ्या टिप्परला महसूल पथकाने मंगळवारी (ता. तीन) पकडून एक लाखाचा दंड वसूल केला आहे.

उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी देवठाणा (ता. पूर्णा) येथील टिप्पर (एमएच २२ - एन ०८३१) देवठाणा शिवारात गोदावरी नदीच्या काठावर अवैधरीत्या वाळू चोरी करत असल्याची माहिती पूर्णा तहसील कार्यालयास दिली. नायब तहसीलदार चंद्रकांत बिजमवार, मंडळ अधिकारी श्री. सरोदे, तलाठी मनिष गुंगे यांच्या पथकास पाठवून सदरील टिप्पर पकडण्याचे निर्देश दिले. मंगळवारी (ता. तीन) सायंकाळी या पथकाने देवठाणा शिवारातील नदीपात्रालगत अवैधरीत्या वाळूची चोरी करीत असताना सदरील टिप्पर पकडून ताब्यात घेतला. सदरील वाहन रात्री तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. त्या विरोधात उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी एक लाख रुपये दंड आकारला आहे. दंड भरपाईची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
 

loading image
go to top