

Female officers lead daring action against sand mafia.
sakal
नायगाव : नायगाव व उमरी महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत बरबडा अंतरगाव परिसरात गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी जप्त केल्या व स्फोटक लावून ( ता.५) रोजी बुधवारी सकाळी उडवून देण्यात आल्या आहेत. महसूल विभागाच्या या धाडसी कारवाईमुळे वाळू माफीयांना चांगलाच दणका बसला आहे. दिवाळी आणि अधिकारी सुट्टीवर असल्याचा फायदा माफीयांनी घेण्यास सुरुवात केली होती.