लाच घेणाऱ्या तलाठ्याला पकडले, केजमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु 

रामदास साबळे
Saturday, 9 January 2021

टाकळी तलाठी सज्जाच्या कार्यक्षेत्रातील तक्रारदाराकडून सहायकाच्या माध्यमातून पाझर तलावात संपादित जमिनीसंबंधीच क्षेत्र कमी दाखविण्यासाठी तब्बल एक लाख रूपयांची लाच मागितली होती.

केज (जि.बीड) : तालुक्यातील टाकळी सज्जाच्या तलाठ्यासह सहायकास पन्नास हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात रंगेहाथ पकडले. ही कारवाई तहसील कार्यालयाच्या आवारात शनिवार (ता.नऊ) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. ही कारवाई तहसील कार्यालयाच्या आवारात झाल्याने एकच खळबळ उडाली होती.

जनता तुम्हाला माफ करणार नाही, इम्तियाज जलीलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

तालुक्यातील टाकळी तलाठी सज्जाच्या कार्यक्षेत्रातील तक्रारदाराकडून सहायकाच्या माध्यमातून पाझर तलावात संपादित जमिनीसंबंधीच क्षेत्र कमी दाखविण्यासाठी तब्बल एक लाख रूपयांची लाच मागितली होती. या तडजोड होऊन तडजोडीअंती सहायकाकडून पन्नास हजार रुपये स्वीकारताना शनिवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शनिवारी दुपारी पथकाने तलाठ्यासह सहायकास रंगेहाथ पकडले. तलाठी दयानंद शेटे (वय ५०) असे लाचखोर तलाठ्याचे तर, सचिन घुले (वय ३१) असे पकडलेल्या सहायकाचे नाव आहे. दोघा लाचखोराविरोधात  लाचलुचपत प्रतिबंधक‌‌ कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revenue Officer Trapped In ACB Keij Beed Crime News